Saturday, July 27, 2024

दु:खद! ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन; सिनेसृष्टीत पसरली शाेककळा

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शांता तांबे यांचे सोमवारी (दि. 19 जून)ला निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी जगाचा निराेप घेतला. शांता तांबे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत एक अनाेखी ओळख निर्माण केली होती. शांता तांबे यांनी करिअरच्या सुरुवातील नाटकामध्ये काम केले आणि नंतर अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. देश बंधू संगीत मंडळी यांच्या नाटकात त्यांनी काम केले आहे.

महत्वाचे म्हणजे शांता तांबे (shanta tambe) यांनी दिनकर पाटील, भालजी पेंढारकर, अनंत माने यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांसाेबत काम केले आहे. त्यांच्या लाेकप्रिय चित्रपटांमध्ये ‘चांडाळ चौकडी’, ‘मोहित्यांची मंजुळा’,’सोंगाड्या’, ‘चंदनाची चोळी’, ‘मर्दानी’, ‘दोन बायका फजिती ऐका’, ‘बाई मोठी भाग्याची’, ‘सवाल माझा ऐका’, ‘असला नवरा नको गं बाई’,’मोलकरीण’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

एका मुलाखतीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याबाबत शांता तांबे यांनी सांगितले की, “घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने मी चित्रपटात काम करण्याचे ठरवले. मात्र, अभिनयक्षेत्रात आल्यानंतर मी या क्षेत्रात प्रगती केली.”(marathi movie actress shanta tambe passes away at the age of 90)

अधिक वाचा-
‘जलेगी भी तेरी बाप की’, हनुमानाच्या तोंडून हा डायलॉग ऐकून थक्क झालेत सुनील लहरी; म्हणाले, ‘अत्यंत लज्जास्पद…’

‘एक ब्राही खरेदी करता आली नाही…’ नाेरा फतेहीला का केले जात आहे ट्राेल? लगेच वाचा

हे देखील वाचा