Sunday, June 8, 2025
Home अन्य ‘कोर्ट’ चित्रपटातील मुख्य अभिनेते, आंबेडकर चळवळीतील विद्रोही कार्यकर्ते ‘वीरा साथीदार’ काळाच्या पडद्याआड

‘कोर्ट’ चित्रपटातील मुख्य अभिनेते, आंबेडकर चळवळीतील विद्रोही कार्यकर्ते ‘वीरा साथीदार’ काळाच्या पडद्याआड

‘कोर्ट’ या मराठी चित्रपटातील अभिनयामुळे जागतिक स्तरावर चर्चेत आलेले अभिनेते ‘वीरा साथीदार’ यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वीरा साथीदार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतू उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

साथीदार यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला असून, अनेक दिग्गजांनी आणि त्यांचे चाहते, सहकारी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

Photo Courtesy: ScreenGrab Movie Court
Photo Courtesy ScreenGrab Movie Court

अभिनयाव्यतिरिक्त, लेखन आणि गाण्यासाठी प्रख्यात वीरा साथीदार हे प्रसिद्ध आहेत. यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त ‘कोर्ट’ या चित्रपटामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

अभिनेत्री नयना मुके यांनी वीरा साथीदार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, ‘अशा महान कलाकाराने आम्हाला असे सोडून जाणे फार वाईट आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यावेळी संसर्गाची गती खूप वेगवान आहे आणि हे लक्षात घेता, वृद्धांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.’ नयना म्हणाल्या की, ‘वीरा साथीदार यांचा मृत्यू हा भारतीय चित्रपटसृष्टीला न भरून येणारा तोटा आहे.’

‘कोर्ट’ चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनीही वीरा साथीदार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. चैतन्य म्हणाले की, वीरा साथीदार एक माणूस म्हणून खूप चांगले होते.

हे देखील वाचा