Friday, July 5, 2024

‘आता होणार आनंदाचा खेळ, तिकीट बारीवर जोमात!’, ‘या’ तारखेपासून ‘झिम्मा’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!

कोरोना महामारीमुळे अनेक दिवसांपासून चित्रपटगृह बंद होते. अशात ठाकरे सरकारने यावर निर्णय घेतला आहे. २२ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह सुरू करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे संपूर्ण रसिक प्रेक्षकांसह मराठी आणि बॉलिवूडमधील कलाकार देखील आनंदी आहेत. अनेक दिग्दर्शकांनी आपल्या लांबणीवर टाकलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अशात आता सिद्धार्थ चांदेकरचा ‘झिम्मा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती दिली आहे. त्याने चित्रपटाच्या पोस्टरचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आता होणार आनंदाचा खेळ, तिकीट बारीवर जोमात! १९ नोव्हेंबर पासून, ‘झिम्मा’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!” सिद्धार्थने शेअर केलेल्या या पोस्टमुळे त्याचे चाहते खूप खुश झाले आहेत. अनेकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (Marathi movie jhimma cinema release date declared on social media)

या चित्रपटामध्ये बायकांची धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. हेमंत ढोमे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. तसेच यामध्ये सोनाली कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, सायली संजीव, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि अनंत जोग हे कलाकार दमदार अभिनय करताना दिसणार आहेत.

चित्रपटामध्ये सिद्धार्थची एक टूर्स ऍंड ट्रॅव्हल्सची कंपनी असते आणि त्याची पहिलीच ट्रिप ही संपूर्ण बायकांनीच भरलेली असते. बायकांच्या आयुष्यातील प्रश्न, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आणि छोट्या गोष्टींमधून आयुष्य जगण्याची त्यांची पद्धत या सर्वांवर या चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आले आहे. तसेच एक बाई कधी कुठे आणि कोणत्या प्रसंगावर कशा पद्धतीने व्यक्त होणार याची कुणालाही काहीच कल्पना नसते. हीच सर्व धमाल घेऊन ‘झिम्मा’ तुमच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

यामध्ये सर्व महिला इंग्लंडला फिरायला गेलेल्या दिसणार आहेत. खूप जास्त धमाल, मज्जा- मस्ती आणि ड्रामा या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा