Wednesday, July 3, 2024

ए भावड्या! परश्यानं दिला सकारात्मकतेचा संदेश, फोटो होतोय जबराट व्हायरल

‘ए परश्या आर्ची आली आर्ची…’ हा डायलॉग तर सर्वांनीच ऐकला असेल नाही का? अर्थातच नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातील हा डायलॉग आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटात परश्याची म्हणजेच प्रशांत काळे ही भूमिका साकारलेला अभिनेता आकाश ठोसरला या चित्रपटाने एका रात्रीत स्टार बनवले. महाराष्ट्रच नव्हे, तर भारतभर त्याला ओळख मिळाली. आज त्याच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चांगलाच सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही तो शेअर करताना दिसतो. अशातच त्याने आपल्यातील चांगले विचारही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर छानसं हसू दिसत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

त्याने आपला फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये सकारात्मक संदेश देत लिहिले की, आपला चेहरा सदैव सूर्यप्रकाशाकडे ठेवा त्यामुळे आपली सावली आपल्या मागे पडेल.’ त्याचा हा फोटो चाहत्यांना भलताच आवडला आहे.

या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. या फोटोला २० हजारांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत.

यापूर्वी त्याने आपले बरेच फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याची हटके स्टाईल आणि फॅशन चाहत्यांना आकर्षित करत आहे. तो आपल्या अभिनयाव्यतिरिक्त आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळेही चाहत्यांमध्ये कमालीचा चर्चेत असतो.

आकाशने सैराटनंतर ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचा ‘१९६२: द वॉर इन द हिल्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा