Saturday, April 19, 2025
Home मराठी लहानपणीच्या आठवणीत का रमली ‘रिक्षावाला फेम’ मानसी नाईक?

लहानपणीच्या आठवणीत का रमली ‘रिक्षावाला फेम’ मानसी नाईक?

नुकताच मानसीने आपल्या बालपणीचा व्हिडिओ इन्ट्राग्रामवर शेयर केला आहे. ज्यात ती आपल्यासोबत एका पाळीव कुत्री एल्साला घेऊन फिरताना दिसत आहे. टॅग मध्ये महाबळेश्वर असे तिने लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय होताना दिसत आहे.

त्या व्हिडिओला कॅप्शन देत मानसी म्हणाली की, लहानपणीचा काळ होता, की तो फक्त एक क्षण होता, पापणी मिटताचं काय माहित कधी आपण एवढे मोठे झालो. तिच्या बालपणीचा हा व्हिडिओ असल्यानं तिने लकडी की काठी हे सुंदर गाणे या व्हिडिओला दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघून आपल्याला आपले लहानपण नक्कीच आठवेल.

 

मानसी ही बघतोय रिक्षावाला या गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवणारी अभिनेत्री आहे . मूळची पुण्याची असणारी ही अभिनेत्री कॉलेज मध्ये असताना मॉडेलिंग करायला लागली. आणि त्यानंतर ती एका मॅगझिन फ्रंट पेज वर दिसायला लागली. ती उत्त्तम नृत्यांगना असून, एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. जबरदस्त या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाला सुरवात केली. तसेच तिने चला हवा येउद्या मध्येही काम केले आहे. बाई वाड्यावर या या गाण्यातून सुद्धा ही मराठी मुलगी घराघरात पोहोचली. नुकतीच ती प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्नबंधनात अडकली असून सोशल मीडियावर मोठया  प्रमाणात सक्रिय असते.

हे देखील वाचा