मराठी टेलिव्हिजनवर सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ज्यामधील काही मालिकांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मात्र काही मालिकांच्या रटाळवाण्या कथा आणि संवाद पाहून प्रेक्षकांनीही जोरदार टिका केली आहे. असाच प्रकार सध्या मराठी टेलिव्हिजवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेबाबत घडला आहे. ज्याची कथा पाहून प्रेक्षकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊ.
सध्या मराठी टेलिव्हिजनवरील ‘मुलगी झाली हो’ मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेला पहिल्यापासूनच प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. मात्र सध्या मालिकेला नवे वळण आले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. वास्तविक मालिकेतील मुख्य अभिनेत्री असलेली साजिरी सध्या प्रेग्नेंट असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र तिच्या पोटात वाढणारे बाळ आपले नसल्याचे शौनक म्हणत आहे. त्यामुळेच याच कथेवर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला आहे. कारण याआधीच्या रंग माझा वेगळा मालिकेतही अशाच प्रकारे कथानक दाखवल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे.
View this post on Instagram
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दिपा आणि कार्तिकमध्येही असेच कथानक दाखवण्यात आले होते. ज्यावेळी दिपाला जुळी मुले होणार होती, त्यावेळी कार्तिकनेही दिपावर संशय घेत हे मुल त्याचे नसल्याचे सांगितले होते. मालिकेतील याच कथेवर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला आहे. इतकेच नव्हेतर मालिकेतील या कथेमुळे प्रेक्षकांनी तुमचा लेखक रजेवर गेला आहे का? असा प्रश्नही विचारला आहे. त्याचबरोबर अनेकांनी तुमच्या लेखकाला दुसरं काही सुचत नाही का असे म्हणत मालिकेच्या कथेची खिल्ली उडवली आहे.
हेही वाचा –
‘आमिर खानला बॉयकॉट करायचं नाही!’ एकता कपूरचा मोठा खुलासा
बलात्कार पिडितेच्या अन्यायाची कहाणी, ‘सिया’ चित्रपटाचा अंगावर काटे आणणारा टिझर एकदा पाहाच
राहत फतेह अली खान यांचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप