या वर्षी चंदेरी दुनियेत अनेक कलाकारांच्या घरात पाळणा हलला आहे. मराठी तसेच बॉलिवूडमधील अनेक घरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अशातच मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीची गायिका सावनी रवींद्र हिला कन्यारत्न प्राप्त झाल्याची बातमी समोर आली होती. मागच्या महिन्यात ६ ऑगस्टला तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिच्या मुलीला सोमवारी (६ सप्टेंबर) एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानिमित्त तिने तिच्या मुलीसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सावनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मुलीसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा पती देखील दिसत आहे. त्या दोघांनीही काळ्या रंगाचे ड्रेस घातले आहेत. पण तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्या मुलीचा पूर्ण चेहरा दिसत नाहीये. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आम्ही एक महिन्याचे झालो. एक महिन्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शार्वी. आम्हाला तुझे पालक म्हणून निवडल्याबद्दल थँक यू.” (marathi singer savani ravindra’s daughtcomplete one month, she share a photo)
तिने शेअर केलेल्या या फोटोवर अभिजित खांडकेकर याने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे तर गायक सलील कुलकर्णी यांनी हार्ट ईमोजी पोस्ट करून “खूप खूप आशीर्वाद” अशी कमेंट केली आहे. यासोबत शरयू दाते, तेजस्विनी पंडित आणि ऋता दुर्गुळे यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.
सावनीने तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर तिला मुलगी झाल्याची माहिती देखील तिने दिली होती. तसेच मुलीचे बारसे झाल्यानंतर तिने तिच्या मुलीचे नाव काय ठेवले आहे हे देखील सोशल मीडियावर सांगितले होते.
सावनी ही प्रेग्नेंसी दरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. ती नेहमीच तिचे फोटो आणि गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत होती. त्यामुळे तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.
सावनी ही संगीत क्षेत्रातील एक आघाडीची गायिका आहे. तिने राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवला आहे. ती नेहमीच संगीत क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करत असते. तिने मराठीसह हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली आणि कोकणी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तिचे केवळ भारतातच नव्हे, तर जगभर नाव पसरले आहेत. त्यामुळे तिच्या चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’
-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज