Wednesday, July 3, 2024

‘तो दिवस माझ्या नेहमी स्मरणात राहील…’ शरद पवारांच्या भेटीनंतर शिवानी बावकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावरील ‘लागीर झालं जी’ ही मालिका प्रचंड गाजली. मालिकेची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय  प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळेच या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला घराघरात लोकप्रियता मिळाली. सध्या ही मालिका संपली असली तरी मालिकेतील कलाकारांना मात्र प्रेक्षक आजही विसरले नाहीत. सध्या लागीर झालं जी मालिकेतील शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकरची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

शिवानी बावकरही मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘लागीर झालं जी’ मालिकेतील शितलीच्या भूमिकेने अभिनेत्रीला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली.  आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाइतकीच शिवानी सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. नुकतेच आषाढी वारी निमित्त तिने सोशल मीडियावर शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar)

 

या पोस्टमध्ये शिवानीने “राजेश सरकटे निर्मित ‘गजर पंढरीचा’ रौप्य महोत्सवी भक्तीमय कार्यक्रमाचा आषाढी एकादशी निमित्त आस्वाद घेतला आणि मन अगदी प्रसन्न झाले. आषाढी एकादशीचा तो दिवस माझ्या नेहमी स्मरणात राहील याची खात्री आहे. माननीय श्री शरद पवार साहेब, माननीय श्री रावसाहेब दानवे साहेब आणि माननीय श्री राजेश टोपे साहेब अश्या सुश्रुत व्यक्तींची भेट होणे व त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळणे हा माझ्यासाठी अतिव आनंदाचा अनुभव,” असे म्हणत आपला आनंद व्यक्त केला आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा