टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यातील सगळ्यांची आवडती मालिका ‘माझा होशील ना!’ होय. या मालिकेने एका वर्षातच यशाचे शिखर गाठले. मालिकेची कहाणी काहीशा वेगळ्या आशयावर आधारित असल्याने प्रेक्षकांनी देखील मालिकेला जबरदस्त प्रतिसाद दिला. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात देखील या मालिकेला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यावरूनच या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते.
मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी सई आणि आदित्य ही पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही पात्र गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांनी निभावली होती. मालिकेत सई या पात्राने लोकप्रिय झालेली गौतमी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडिया माध्यमातून तिच्या चाहत्यांना दाखवत असते. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे. (Marathi actress gautami deshpande share her photo on social media)
गौतमीने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाचा एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे. यावर तिने लाल रंगाचे नी सॉक्स घातले आहेत. तसेच गळ्यात केवळ एक मोत्याची माळ घातली आहे. तसेच केस कर्ली करून तिने मोकळे सोडले आहे. या ड्रेसमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
तिच्या या फोटोवर चाहते सातत्याने कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “सावन में आग लग गयी.” तसेच आणखी एकाने लिहिले की, “बार्बी डॉल.” अशाप्रकारे या फोटोवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
गौतमी ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिच्या प्रत्येक पोस्टला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. तिने ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या आधी ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत हर्षद अटकरी मुख्य भूमिकेत होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी?’, अभिनेत्रीची सोज्वळता पाहून चाहत्याने ठेवला थेट लग्नाचा प्रस्ताव
-‘या’ दिवशी होणार झी मराठी पुरस्कार सोहळा साजरा, प्रिया मराठेने व्हिडिओ शेअर करून दाखवली डान्सची झलक
-सोनाली कुलकर्णीचा ‘शटर’ चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर