Saturday, July 6, 2024

धक्कादायक! क्रांती रेडकरच्या घरात चोरी, ‘एवढ्या’ लाखांचा बसला फटका

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या अभिनयापेक्षा जास्त सोशल मीडियावर सक्रिय असते. सतत आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मात्र, नुकतंच अभिनेत्रीबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

‘कोंबडी पळाली’ गाण्याने आख्या माहाराष्ट्राला नाचवणारी प्रसिध्द अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या घरात चोरी झाल्याच प्रकरण समोर आलं आहे. त्याच बोरबर ही चोरी कोणी केली आहे, त्या व्यक्तीचं नावंही समोर आलं आहे. क्रांतीने तिच्या घरातील काम करणाऱ्या मोलकरनीवर चोरीचा आरोप केला आहे.

क्रांतीच्या घरातील काही मौल्यवान वस्तु आणि साडे चार लाख रुपये रोख त्यासोबतच माहागडं घड्याळ इत्यादी वस्तूंची चोरी केला आहे. अभिनेत्रीने स्वत: या चोरीबद्दल गोरेगाव पोलिस ठाण्यामध्य तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून या प्रकरणातील तपास सुरु केला आहे.

 

View this post on Instagram

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती रेडकर हिने एका एजन्सीमार्फत घरात काम काम करणाऱ्या महिलेची नेमणूक केली होती. पण काही दिवस काम केल्यानंतर तिने घरातील सदस्या नसताना चांगली संधी साधत ही चोरी केली असून ती  महिला फरार झाली आहे. आता गोरेगाव पोलिस त्या महिलेला काम देणाऱ्या एजन्सीचा तापास करत असून फाररा झालेल्या महिलेचाही शोध घेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बरेच वर्ष जगापासून लपून रिलेशनशिपमध्ये होती कथा फेम अदिती शर्मा, नंतर केले ‘या’ अभिनेत्याशी लग्न
ब्रेकिंग! प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा अपघात, रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा