Saturday, November 23, 2024
Home बॉलीवूड भज्जीची लव्हस्टोरी: मित्राने करुन दिली होती गीता बसराशी ओळख, मात्र तिने दिला होता लग्नाला नकार

भज्जीची लव्हस्टोरी: मित्राने करुन दिली होती गीता बसराशी ओळख, मात्र तिने दिला होता लग्नाला नकार

बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आज १३ मार्च रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय वंशाची ब्रिटीश अभिनेत्री गीता हिने ‘दिल दिया है’ (2006) मधून चित्रपटात पदार्पण केले होते. तिचा दुसरा चित्रपट ‘द ट्रेन’ (2007) हा होता. या दोन्ही चित्रपटांमध्ये तिचा नायक इमरान हाश्मी होता. असे असूनही, ती पहिल्यांदा खऱ्या अर्थाने तेव्हा चर्चेत आली, जेव्हा हरभजन सिंगसोबत तिच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या. या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा एक अवॉर्ड शो होस्ट करताना, शाहरुख खान हरभजन सिंगला म्हणाला, “गीताची शपथ घेऊन सांग घर कधी बसवतोय.”

एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती पहिली भेट
प्रत्येक लव्हस्टोरी प्रमाणेच इथेही एक कॉमन फ्रेंड होता, ज्याने दोघांची भेट करून दिली. 2007 साली पंजाबी मुलगा भज्जी आणि इंग्लंडच्या पोर्ट्समाउथमधून आलेल्या गीताची पहिली भेट ही त्यांच्या कॉमन फ्रेंडमुळे झाली. या भेटीत त्यांचे फक्त हाय-हॅलो झाले. गीता बॉलिवूड स्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण करू लागली, तर हरभजन सिंग क्रिकेटचे. पण गीताचे चित्रपट तिच्या अपेक्षेप्रमाणे हिट होत नव्हते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

क्विक एन्ट्री आणि सुरू झाला लाईमलाईटचा प्रवास
दरम्यान, 2008 मध्ये हरभजन सिंग ‘एक हसीना, एक खिलाडी’ या रियालिटी शोमध्ये सामील झाला. शोमध्ये त्याची डान्स पार्टनर मोना सिंग होती. या जोडीने सर्वांना मागे सोडून हा शोही जिंकला. शोच्या प्रमोशन दरम्यान भज्जी वांद्रे (मुंबई) येथील फाइव स्टार हॉटेलमध्ये थांबला होता. इथेच गीता बसरा पहिल्यांदा भज्जीसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसली.

इथून सुरू झाला प्रेमाचा खरा प्रवास सुरू
भज्जी आणि गीता यांचे प्रेमसंबंध आधीपासूनच चर्चेत होते. पण 2011 मध्ये ब्युटी क्वीन गीता आणि टर्बनेटर भज्जी यांच्या प्रेमाच्या चर्चांनी जोर धरला. भारतातील नोएडा सर्किटमध्ये आयोजित पहिल्या एफ -1 शर्यतीच्या दरम्यान, हे दोघे एकमेकांच्या हातात हात घेऊन फिरताना दिसले. या जोडप्याची ही भेट बर्‍याच दिवस चर्चेत राहिली. या नात्याबद्दल विचारले असता, गीताने “चांगला मित्र” असे बोलून विषय टाळला. परंतु भज्जी काहीही बोलण्याऐवजी इकडे तिकडे बघून हसू लागला. यानंतर भज्जी आणि गीताची जोडी बर्‍याच टीव्ही शोमध्ये गेस्ट म्हणून दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

भज्जीला म्हणाली होती, दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न कर
गीताने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिने एकदा हरभजनला दुसर्‍या कोणासोबत तरी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. ती म्हणाली, “एक वेळ अशी आली, जेव्हा मी त्याला माझ्याशी बोलू नको असे सांगितले होते. मी माझ्या मार्गाला जाईल आणि तो त्याच्या. मी त्याला म्हणाले की, दुसऱ्या कोणाला शोध आणि तिच्यासोबत सेटल हो. त्यावेळेस त्याला माझ्याशी लग्न करायचे होते, पण मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. मला वाटायचे की माझ्या नशिबात काहीतरी वेगळे लिहिले आहे. जे व्हायचं असेल ते होईलच. त्याच्या काही महिन्यांनंतरच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.” पुढे या दोघांचे ऑक्टोबर 2015 मध्ये लग्न झाले आणि आता ते एका मुलीचे आणि एका मुलाचे पालक आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात …”, सीमा पाहवा यांचं माेठं वक्तव्य, एकदा वाचाच

मधुचंद्रानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार स्वरा, हळदीच्या रंगात रंगली अभिनेत्री

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा