Wednesday, January 28, 2026
Home बॉलीवूड …पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत मोहित चौहानने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा

…पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत मोहित चौहानने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा

बॉलिवूडमधील दिग्गज गायक ‘मोहित चौहान’ यांना आज संपूर्ण जग ओळखतं. बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. आपल्या करिअरमध्ये त्यांनी ‘मटरगश्ती’, ‘तूझे भूला दिया’, ‘सड्डा हक’ अशी अनेक गाणी गायली आहेत. परंतु खूप कमी व्यक्तींना या गोष्टीची माहिती असेल की, आपल्या सुरेल आवाजाने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे गायक मोहित चौहान यांना त्यांच्या आयुष्यात गायक नाही, तर अभिनेता बनायचे होते. या गोष्टीचा खुलासा स्वत: मोहित यांनी केला आहे.  

गायक मोहित चौहान यांनी स्वत:‌ ही गोष्ट सांगितली आहे की, “मी थिएटर केले आहे. मी एनएसडीचा एक भाग होतो. स्टेजवर देखील मी अनेक नाटकांमधून काम केले आहे. मला एफटीआयआय सोबत काम करायचे होते. परंतु तिथे अभिनयाचा क्लास नव्हता. त्यामुळे मला संधी मिळाली नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Chauhan (@mohitchauhanofficial)

मोहित यांना खरी ओळख बॅड सिल्क रूटच्या ‘डुबा डुबा’ या गाण्याने मिळाली. नंतर त्यांनी 2005 मध्ये आलेल्या ‘मैं, मेरी पत्नी ओर वो’ या चित्रपटात गुच्छा हे गाणे गायले. या एका गाण्यानंतर त्यांनी एआर रेहमान, प्रितम यांसारख्या संगीतकारांसाठी गाणी गायली.” अभिनयाबद्दल बोलताना मोहित असे बोलले की, “जर मला ऑफर मिळाली, तरीही अभिनय करायला मला आवडेल.”

त्यानंतर 2006 मध्ये राकेश ओम प्रकाश मेहरा हे ‘रंग दे बसंती’ हा चित्रपटात बनवत होते. एआर रेहमान या चित्रपटाला संगीत देत होते, तेव्हा त्यांनी मोहित यांना गाण्यासाठी विचारले. या चित्रपटात त्यांनी ‘खून चला’ हे गाणे गायले. या गाण्यानंतरच त्यांच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळीचा एक जबरदस्त किस्सा देखील आहे. मोहित यांना हे गाणे रेकॉर्ड करायच्या आधी खूपच भीती वाटत होती. त्यांचे गाणे चांगले होईल की नाही याबाबत त्यांना खूप चिंता वाटत होती. त्यासाठी त्यांना रेहमान यांचा ओरडा देखील खावा लागला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सांगितला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा रंजक किस्सा म्हणाली, ‘मला तेव्हा एवढी….,’
oscars 2023 live stream: RRR ला अवॉर्ड जिंकताना बघायचे आहे? ऑस्कर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या

हे देखील वाचा