Monday, July 21, 2025
Home हॉलीवूड शूटिंगच्या सेटवरच जिवंत जळाली होती ‘ही’ अभिनेत्री, वाचा एका माचिसच्या काडीने कसा घेतला जीव

शूटिंगच्या सेटवरच जिवंत जळाली होती ‘ही’ अभिनेत्री, वाचा एका माचिसच्या काडीने कसा घेतला जीव

चित्रपटाच्या दुनियेत प्रत्येक सीन शक्य तितका रियल बनवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असतो. जेणेकरून प्रेक्षकांना समोर दिसणाऱ्या कथेतील सगळ्या भावना अनुभवता याव्यात. मात्र, काही वेळा असे प्रयत्न धोकादायकही ठरतात. कधी कलाकारांच्या चुकीमुळे तर कधी निर्मात्यांच्या चुकीमुळे शूटिंग सेटवर मोठी दुर्घटना घडते. अशीच एक दुर्घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जिवंत जळाली मार्था मॅन्सफिल्ड
आज आम्ही तुम्हाला तो किस्सा सांगणार आहोत, ज्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे एका अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला. आम्ही बोलत आहोत दिवंगत हॉलिवूड अभिनेत्री मार्था मॅन्सफिल्डबद्दल. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मार्था मॅन्सफिल्डसोबत एक भयानक अपघात झाला, ज्यानंतर अनेक प्रयत्न करूनही तिचा जीव वाचू शकला नाही. (martha mansfield burned alive on the shooting set know unknown shocking fact)

माचिसच्या काडीमुळे गेला जीव
मार्था मॅन्सफिल्ड त्या काळातील सुपरस्टार होती, जेव्हा चित्रपटांमध्ये आवाज नसायचा. ‘द वॉरन्स ऑफ व्हर्जिनिया’साठी शूटिंग करत असताना, मार्था मॅन्सफिल्डने तिचा गृहयुद्धाचा पोशाख परिधान केला होता, ज्याने पटकन आग पकडली जाते. सीन संपवून ती गाडीत बसली आणि आराम करायला लागली. त्याचवेळी जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिच्या दिशेने माचिसची काडी फेकली.

उपचार करूनही वाचू शकला नाही जीव
एका माचिसच्या काडीमुळे मार्थाच्या ड्रेसला आग लागली आणि ती गंभीरपणे भाजली. अपघातानंतर मार्था मॅन्सफिल्डला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्यावर दोन दिवस उपचार सुरू राहिले. पण ती इतकी भाजली होती, की तिला वाचवता आले नाही. दोन दिवसांनी मार्थाने आपला जीव गमावला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा