Saturday, June 29, 2024

Masaba Masaba Season 2 | आई नीनासोबत धमाल करायला पुन्हा सज्ज झालीय मसाबा, ट्रेलर पाहुन वाढेल उत्कंठा

आई-मुलगी नीना गुप्ता (Neena Gupta) आणि मसाबा गुप्ता (Masaba Gupta) यांची जोडी पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘मसाबा मसाबा सीझन २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी याचा ट्रेलर आला आहे आणि त्यामुळे या वेब सिरीजबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे. पहिल्या सीझनमध्ये नीना आणि मसाबा यांनी त्यांच्या मस्त शैलीत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. यासोबतच फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित काही अस्पर्शित आणि अस्पृश्य पैलूही दाखविण्यात आले. आता ‘मसाबा मसाबा सीझन १’ तुमच्या मनोरंजनासाठी येत आहे. 

नव्या सीझनमध्ये आई आणि लेक नव्या आव्हानांना तोंड देताना दिसणार आहेत. ती तिच्या वर्क लाईफ आणि लव्ह लाईफ यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. इंस्टाग्रामवर ‘मसाबा मसाबा सीझन २’ चा ट्रेलर शेअर करताना मसाबाने लिहिले की, “ती एक राजकुमारी आहे. ती राणी झाली आहे. आता तिच्यावर ‘किंग’ होण्याची वेळ आली आहे.” (masaba masaba season 2 trailer out)

जवळपास दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मसाबा प्रेम आणि काम यांच्यात संघर्ष करताना दिसत आहे. खऱ्या आयुष्याप्रमाणेच ती या सिरीजमध्येही फॅशन डिझायनरच्या भूमिकेत आहे. नीनाचे पात्रही मागच्या वेळेप्रमाणेच मनोरंजक आहे. सोनम नायरने ‘मसाबा मसाबा सीझन २’ दिग्दर्शित केला आहे. नीना आणि मसाबा व्यतिरिक्त यात नील भूपलत, रयताशा राठौर, कुशा कपिला, करीमा बैरी, बरखा सिंग, राम कपूर आणि अरमान खेरा हे कलाकार दिसणार आहेत.

‘मसाबा मसाबा सीझन २’ नेटफ्लिक्सवर २९ जुलै रोजी रिलीझ होत आहे. याचा पहिला सीझन २०२० मध्ये आला होता. ही सिरीज मसाबा गुप्ताच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. मसाबाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत फॅशन इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा