Tuesday, July 9, 2024

तब्बल 203 घरांमध्ये स्वयंपाक करत उर्मिला ‘बा’ यांनी चालवला स्वतःचा संसार, वाचा त्यांची प्रेरणादायी कहाणी

काही दिवसांपूर्वीच टेलिव्हिजनवर सर्वांचा लाडका मास्टरशेफ इंडिया हा कार्यक्रम सुरु झाला. यावर्षी या शोचे ७ वे पर्व आहे. या शोमध्ये सर्वच वयोगातील लहानमोठ्या स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. मात्र या सर्व स्पर्धकांमध्ये सर्वच दर्शकांच्या फेव्हरेट बनल्या आहेत ‘बा’. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी या शोमध्ये शभंग घेतला असून, त्यांचे निरागस हसणे आणि उत्साह सर्वांनाच आवडताना दिसत आहे. ‘बा’ यांचे पूर्ण नाव आहे, उर्मिला जमनादास असर असून लोकं त्यांना प्रेमाने ‘बा’ म्हणतात. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक दुःख पाहिली. मात्र त्यांनी कधीच हार मानली नाही. परिस्थितीवर मात करत त्या जगत आल्या आहे. बा यांचे एक यूट्यूब चॅनेल असून त्याचे नाव गुज्जू बेन आहे, यावर त्या नेहमीच विविध प्रकारच्या रेसिपी दाखवत असतात.

उर्मिला बा यांना यूट्यूब मार्फत लोकप्रियता तर मिळाली मात्र मास्टरशेफमुळे त्यांना लोकप्रियतेसोबतच प्रसिद्धी मिळाली. सध्या बा सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असून, त्यांनी त्यांच्या वर्तवणुकीमुळे आणि रेसिपींमुळे परीक्षकांसोबतच प्रेक्षकांचे देखील मनं जिंकले आहे. एकेकाळी बा २०३ घरांमध्ये जाऊन स्वयंपाक करायच्या आणि चरितार्थ चालवायच्या. खूप कमी वयात नवरा आणि मुलांना गंवल्यांनंतर देखील त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्यांच्या जीवनाला दुसरी संधी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gujju Ben na Nasta (@gujjubennanasta)

उर्मिला बा यांना लॉकडाऊनमध्ये आर्थिक तंगी निर्माण झाली. आपले घर चालवण्यासाठी काहीतरी करायची त्यांना इच्छा होती. मग त्यांनी त्यांच्या नातवांसोबत हर्षसोबत मिळून ‘गुज्जू बेन ना नास्ता’ नावाचे यूट्यूब चॅनेल सुरु केले. यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक रेसिपी दाखवतात. त्यांना अनेक फॉलोवर्स असून, त्यांच्या डिशेसला मिलियन व्ह्यूज देखील मिळाले आहे.

तत्पूर्वी उर्मिला बा यांची अडीच वर्षाची मुलगी तिसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे मरण पावली. त्यानंतर त्यांच्या एका मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि तिसरा मुलगा ब्रेनट्युमरमुळे मरण पावला. तीन मुलांना गंवल्यानंतर त्यांनी घराचं जबाबदारी खांद्यावर घेतली आणि काम सुरु केले. आता त्या त्यांच्या सून आणि नातवांसोबत राहतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठ्या बॉलिवूडस्टारला देखील कमाईच्या बाबतीत मागे टाकेल खेसारी लाल यादव ‘इतक्या’ कोटींची आहे संपत्ती

सुशांत सिंग राजपूतच्या जवळच्या सदस्याचे झाले निधन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बहिणीची माहिती

हे देखील वाचा