Friday, May 9, 2025
Home बॉलीवूड ‘लेके पहला पहला प्यार’ गाण्यावर मौनी राॅयने धरला ठेका, व्हिडिओ पाहून चाहत्यांनाही फुटला घाम

‘लेके पहला पहला प्यार’ गाण्यावर मौनी राॅयने धरला ठेका, व्हिडिओ पाहून चाहत्यांनाही फुटला घाम

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी राॅय पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या डान्समुळे चर्चेत आली आहे. मौनी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तसेच ती व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. मौनी रॉय सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक, तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. सध्या मौनीचा असाच हटके व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. मौनीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

अनेक वेळा मौनी हटके पोझ आणि मजेशीर व्हिडिओ शेअर करताना दिसते. मौनीने नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर अकाउंटवर अपलोड केला आहे. हा एक ब्लॅक आणि व्हाईट व्हिडिओ आहे, ज्यामध्ये मौनीने ‘लेके पहला पहला प्यार’ गाण्यावर ठेका धरल्याचे दिसत आहे. मौनी एक प्रसिद्ध क्लासिकल नृत्यांगना आहे आणि तिला डान्सची प्रचंड आवड आहे. या आधीही मौनीने आपली कला सर्वांसमोर सादर केली आहे.

मौनीचा हा डान्स व्हिडिओ पाहून चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘खूप छान!’ तर दुसऱ्या युजरने म्हटले की, ‘व्वा! खूपच सुंदर’. तर, काही चाहत्यांनी हार्ट ईमोजींचा पाऊसच पाडला आहे. अनेकांनी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. मौनीच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत.

मौनीविषयी बोलायचे झाले, तर मौनी राॅय लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील महत्वाची भूमिका बजावताना दिसतील. गेल्याच वर्षी मौनीची ‘लंडन कॉन्फिडेंशियल’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली होती. त्यामुळे मौनी प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. याशिवाय मौनी सध्या तिच्या “बैठे बैठे” या गाण्यावरील व्हिडिओमुळे चर्चेत होती. या व्हिडिओमध्ये ती अंगद बेदीसोबत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा