बॉलिवूडमध्ये सध्या अनेक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होत आहेत. अनेक कलाकारांना म्युझिक व्हिडिओमधून लोकप्रियता मिळत आहे. अशातच अभिनेत्री मौनी रॉय ही सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर तिच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला आहे. तिने टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडल्यानंतर, आता बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम करत आहे. यासोबतच ती तिच्या म्युझिक व्हिडिओमुळे देखील चांगलीच चर्चेत असते.
मौनी रॉयचा मंगळवारी (२९ जुलै) एक गाणे प्रदर्शित झाले आहे. तिचे ‘बैठे बैठे’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. प्रेक्षक या गाण्याला जोरदार प्रतिसाद दर्शवत आहेत. सोशल मीडियावर हे गाणे वेगाने व्हायरल होत आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये मौनी रॉयसोबत अंगद बेदी दिसत आहे. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. काही वेळापूर्वी यूट्यूबवर प्रदर्शित झालेल्या या म्युझिक व्हिडिओला आतापर्यंत ११ लाखापेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. (Mauni Roy and Angad bedi’s baithe baithe music video release on YouTube)
मौनी रॉयचे हे गाणे झी म्युझिकद्वारे प्रदर्शित केले आहे. मौनी रॉयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच अयान मुखर्जीच्या ऍक्शन फैंटेसी ड्रामा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि तेलुगू सुपरस्टार नागार्जुनसोबत दिसणार आहे. याआधी तिची ‘लंडन कॉन्फिडेन्सीअल’ ही वेबसीरिज रिलीझ झाली होती. तिच्या या वेब सीरिजला देखील प्रचंड प्रेम मिळाले आहे. तिने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मौनीने ‘मेड इन चायना’ या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका निभावली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राजकुमार राव- राधिका आपटे नेटफ्लिक्सवर झळकणार एकत्र; ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा पहिला लूक आला समोर