Tuesday, July 9, 2024

‘अगर तुम साथ हो’ गाण्यावर लावले मौनी रॉयने ठुमके, चाहते तर सोडाच सेलेेब्रिटींनीही पाडला कमेंटचा पाऊस

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय या दिवसात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसत आहे. तिच्या अभिनयाने तिने सगळ्यांचे मन तर जिंकेलच आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देखील तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग पाहायला मिळते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करता क्षणीच व्हायरल होत असतात. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धमाल करताना दिसत आहे. तिने दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या ‘अगर तुम साथ हो’ या गाण्यावर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केलेला दिसत आहे.

मौनी रॉयने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मौनी ब्लॅक ड्रेस घालून जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने असे कॅप्शन लिहिले आहे की, “आनंदासाठी गाणे म्हणा, आनंदासाठी डान्स करा आणि आनंदासाठी जगा.”

तिचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते तिचे खूपच कौतुक करताना दिसत आहे. आशका गोरडिया हिने कमेंट केली आहे की,” हो यापेक्षा देखील जास्त!!” तर दिशा परमारने फायर ईमोजी टाकून कमेंट केली आहे.

मौनीच्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया तर येतच आहेत पण बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील यावर प्रतिक्रिया दर्शवली आहे. मौनी नेहमीच तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते. याआधी देखील तिने ‘पतली कमरिया’ या गाण्यावर डान्स व्हिडिओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याआधी ती ‘लंडन कॉन्फिडेन्शिल’ या चित्रपटात निदर्शनास आली होती. तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोबाईलच्या दुकानाला सोनू सूदचं नाव, ‘१०० रुपयांचा रिचार्ज मिळेल का?’ म्हणत अभिनेत्याचा मजेशीर अंदाजात प्रतिसाद

-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा