Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘लग्नकल्लोळ’ चित्रपट लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, ‘हे’ कलाकार दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

‘लग्न’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असतो. कितीही नाही म्हटले, तरीही व्यक्तीला आयुष्यात आपल्या साथीदाराची कधी ना कधी गरज भासते. या विषयावर याआधी अनेक चित्रपट बनले आहेत, पण यावेळी लग्न संस्थेवर भाष्य करणारा ‘लग्नकल्लोळ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट लग्नाच्या एका वेगळ्या पैलूवर लक्ष केंद्रित करून प्रेक्षकांसमोर एक वेगळी कहाणी मांडणार आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान आणि मयुरी देशमुख हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल अण्णासाहेब तिरमखे हे या चित्रपटाचे निर्माता आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना लग्नसंस्थेच्या एका वेगळ्या बाजूची ओळख करून देईल हे नक्की. नुकतेच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. हा टिझर सिद्धार्थ जाधव आणि मयुरी देशमुख यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Mayuri Deshmukh’s new lagnkallol movie’s teaser release)

मयुरीने शेअर केलेल्या या टिझरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक कलाकार या टिझरवर कमेंट करून त्यांच्या नव्या प्रोजेक्टला शुभेच्छा देत आहेत. या चित्रपटात मयुरी देशमुखचे पात्र खूप महत्वाचे आणि आकर्षित दिसणार आहे.

मयुरी देशमुख हिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. दहा महिन्यांपूर्वी तिचा पती आशुतोष भाकरे याने वयाच्या ३२ व्या वर्षी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर मयुरी अनेक कठीण प्रसंगातून गेली आहे. अखेर तिने पुन्हा एकदा तिच्या कामात लक्ष दिले‌. ती सध्या स्टार प्लस या वाहिनीवर ‘इमली’ या मालिकेत काम करत आहे. तसेच तिने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. यासोबत तिने ‘३१ दिवस’ आणि ‘डॉक्टर बाबा आमटे’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ स्पर्धकाचा झालाय दोनदा घटस्फोट, घरात करावा लागतोय पहिल्या पतीशी सामना

हे देखील वाचा