Thursday, April 25, 2024

ओशोसारखं दिसण्यासाठी ‘हा ‘अभिनेता दररोज एकाच जागी बसून सहा-सहा तास करतोय मेकअप, फोटो व्हायरल झाल्यावर सगळेच झाले हैराण

आमिर खानपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेक हिंदी चित्रपटातील दिग्गजांनी गेल्या काही महिन्यांत ओशो आणि त्यांची सहकारी आई आनंदशीला यांच्यावर चित्रपट आणि वेब मालिका बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना सुरुवात होण्यापूर्वीच अभिनेता रवी किशन या वादग्रस्त गुरूच्या लुकमध्ये दिसले आहेत. तसेच, रवी किशन यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील मड बेटावर होत आहे.

भाजपचे खासदार आणि अभिनेता रवी किशन यांनी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. परंतु यावेळी ते पडद्यावर ज्या नवीन रूपात दिसणार आहेत, हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रवी किशन हे सध्या प्रवचक ‘ओशो’ यांच्यावर बनत असलेल्या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. या चित्रपटातील ओशोच्या वेशभुषेतील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्यांची नुकतीच समोर आलेली ही छायाचित्रे पाहून रवी किशनने ओशोच्या व्यक्तिरेखेसाठी खरोखर खूप मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे. सेटवरील लोकांचे म्हणणे आहे की, शूटिंग सुरू होण्यापूर्वी रवी किशनला त्यांचा मेक-अप करण्यासाठी दररोज सहा ते सात तास एकाच स्थितीत बसून राहावे लागते. जेव्हा रवी किशनने ओशोच्या वेशभुषेत स्वत: ला प्रथमच आरशात पाहिले, तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले.

मिळालेल्या माहितीनुसार, ओशोवर बनत असलेला हा चित्रपट रजनीश यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित आहे. चित्रपटात त्यांच्या बालपणातील व तारुण्यातील मुख्य घटना दाखविल्या जातील. तसेच, चित्रपटात ओशोचा परदेश प्रवास आणि परदेशी कथा दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या व्यतिरिक्त ओशोच्या धार्मिक पुराणमतवादावरही या चित्रपटाचे लक्ष दिले जाणार आहे. रजनीश ते ओशो आणि त्यानंतर ओशो ते जागतिक ओशो फाउंडेशनपर्यंतचा त्यांचा प्रवास, सरकारशी मतभेद आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांमुळे त्यांना ‘वादग्रस्त धर्मगुरू’ कसे बनवले गेले हे या चित्रपटात दर्शविले जाईल.

या नवीन पात्राबद्दल बोलताना रवी किशन म्हणाले की, “ओशो यांची भूमिका निभावणे हे एक मोठे आव्हान आहे. ओशोची लोकप्रियता भारताबरोबरच जगभरातही आहे. ‘सिक्रेट्स ऑफ लव्ह’ चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा समावेश करण्यात आला आहे. माझ्या या पात्राच्या संशोधनासाठी मी ओशो यांचे सर्व व्हिडिओ पाहिले आणि त्यांच्याबद्दल मला जितकी माहिती मिळवता आली तितकी माहिती मी मिळवली”.

हे देखील वाचा