कोरोनाचा कहर कमी झाला तसा मनोरंजन विश्वात लग्नसराईला बहर आला आहे. अनेक जोड्या लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. यात मराठी कलाकार देखील मागे नाही. मागील काही काळापासून मराठीमधील आघाडीची अभिनेत्री असणारी रसिका सुनील लग्न करणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगात होत्या. तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लवकरच लग्न करणार असल्याची हिंट सर्वांना दिली होती, मात्र तारीख जाहीर केली नव्हती.
आता रसिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या प्री वेडिंग शूटचा असून अतिशय रोमॅंटिक अंदाजमध्ये ते दोघे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रसिका आणि आदित्य दोघेही गोव्यात असून, तिथे त्यांचे हे शूट सुरु आहे. गोव्यातल्या समुद्र किनारी त्यांनी शूट केलेला हा रोमँटिक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रसिकाने पिळवल्या रंगाचा आकर्षक ड्रेस घातला असून, आदित्यने पांढऱ्या रंगाचा टि शर्ट आणि निळ्या रंगाची शॉर्ट पँट घातली आहे. हा व्हिडिओ दोन वेगवेगळे व्हिडिओ एकत्र करून तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये रसिकाच्या हातावर दिसणारी मेहंदी सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, यावरून हे दोघं लवकरच लग्न बंधनात ढकलत असे सांगितले जात आहे. मात्र या दोघांनीही अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.
रसिकाने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “जर तुम्ही हे साईन पाहू शकता तर तुम्हाला माहीतच आहे की, लवकरच काय येणार आहे. थोडे थांबा.” हे कॅप्शन देखील खूप काही सांगून जात आहे. त्यांच्या ह्या प्रीवेडिंग फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. रसिकाने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या शेवटी रस्की वेड्स आदी असे देखील दिसत आहे.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून रसिकाला तुफान लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील अल्लड, निरागस, बालिश शनाया सर्वांनाच खूप भावली. तिने या मालिकेसोबत ‘पोश्टर गर्ल’, ‘गॅट मॅट’, ‘बघतोस काय मुजरा कर’ आदी चित्रपटांमध्ये काम केले, मात्र ती शनाया म्हणूनच ओळखली जाते. रसिकाने ‘तुम बिन मोहें… ‘ या व्हिडीओ अल्बममध्ये गायनासोबतच अभिनय देखील केला आहे.
रसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचे झाले तर, आदित्य बिलागी असे त्याचे नाव असून, औरंगाबादकर असणारा आदित्य मागील नऊ वर्षांपासून लॉस एंजेलिसमध्ये आहे. तो इंजिनीअर असण्यासोबतच एक उत्कृष्ट डान्सर, गायक देखील आहे. आदित्यने त्वायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्टही मिळवला आहे. रसिका शिक्षणासाठी परदेशात गेली असताना तिथेच तिची आणि आदित्यची भेट झाली. नंतर या भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झाले. हे दोघं लग्न करणार हे नक्की असले तरी ते लग्न कधी करणार आहेत, याबद्दल अजून कोणतीही माहिती प्राप्त नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हा तर तोंडावरूनच गुंड वाटतो’, म्हणत पूनम सिन्हा यांच्या आईने नाकारले होते शत्रुघ्न यांचे स्थळ
-जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीझ, प्रदर्शनाची तारीखही जाहीर










