80 आणि 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘दामिनी’ आणि ‘हिरो’सारख्या गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मीनाक्षीने वयाच्या 62 व्या वर्षी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे चाहत्यांना थक्क केले आहे. या व्हिडिओमध्ये तिचा आत्मविश्वास, स्टाईल आणि फिटनेस पाहून चाहते भारावून गेले आहेत.
मीनाक्षी शेषाद्रीने (Meenakshi Seshadri) एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसत आहे. गुलाबी रंगाचा फुल-स्लीव्ह टॉप आणि चमकदार सिल्व्हर शॉर्ट्समध्ये मीनाक्षी अतिशय स्टायलिश आणि आकर्षक दिसत आहे. ओल्या वाळूवर चालताना तिने चांदी रंगाचे सॅंडल (खेचर) घातले असून तिचा लूक अधिकच उठावदार दिसतो. विशेष म्हणजे, या व्हिडिओत तिच्यासोबत एक कुत्राही दिसतो, ज्याला मीनाक्षीने आपल्या “नवी मैत्रीण” म्हणून ओळख दिली आहे.
व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये मीनाक्षीने लिहिले, “समुद्रकिनाऱ्यावर खूप मजा आली! खूप दिवसांनी शॉर्ट्स घालणं खूप छान वाटलं. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मला एक गोंडस मैत्रीण मिळाली. तसेच, तुम्ही मला सांगू शकाल का की मी कोणत्या चित्रपटांमध्ये शॉर्ट्स घातले होते?” या कॅप्शनमधून तिचा मोकळा आणि सकारात्मक स्वभाव दिसून येतो.
हा व्हिडिओ पाहताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेक चाहत्यांनी मीनाक्षीच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचे कौतुक केले. एका चाहत्याने लिहिले, 1987 मध्ये मी 11 वर्षांची असल्यापासून तू माझी ड्रीम गर्ल आहेस.” तर दुसऱ्या चाहत्याने तिच्या जुन्या चित्रपटांची आठवण करून देत तिने कोणत्या चित्रपटांमध्ये शॉर्ट्स घातले होते याची यादीच शेअर केली.
काही चाहत्यांनी मीनाक्षीच्या फिटनेसचे रहस्य विचारले, तर अनेकांनी वय हा केवळ आकडा असल्याचे म्हणत तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी, मीनाक्षी शेषाद्री आजही तिच्या सौंदर्य, स्टाईल आणि सकारात्मकतेमुळे चाहत्यांच्या मनात खास स्थान राखून आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
धार्मिक वादांवर पडदा; केरळ हायकोर्टाकडून ‘हाल’ला हिरवा कंदील, लवकरच रिलीज










