Tuesday, July 9, 2024

‘बिग बॉस मराठी’मध्ये येण्यापूर्वी मीरा अन् सुरेखा यांच्यात झाले होते वाद, स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. शोमध्ये अनेक वेगवेगळ्या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. अशातच घरातील नॉमिनेशनचा टास्क देखील पार पडला आहे. शोमध्ये आलेले काही स्पर्धक एकमेकांना आधीपासूनच ओळखतात, तर काहींची बिग बॉसच्या घरात नव्याने ओळख झाली आहे. शोमध्ये मीरा जगन्नाथ ही जोरदार चर्चेत आहे. अशातच तिने सुरेखा कुडची यांच्यासोबत आधी काम केले होते या गोष्टीचा खुलासा केला.

बिग बॉसमध्ये मीरा सुरेखा यांना म्हणते की, “आपण या आधी काम केले आहे.” यावर त्या म्हणतात, “कधी मला काही आठवत नाही.” यावर ती म्हणते की, “नकळत सारे घडले या मालिकेत एकत्र काम केले होते.” त्यावेळी सुरेखा कुडची यांना मीरा म्हणाली, “तिकडे आपलं काहीतरी झालं होतं,” यानंतर सुरेखा कुडची म्हणाल्या, “काय झालं होतं माझ्यासाठी रात गई बात गई.” (Meera jagnnath told that there was argument between her and surekha kudachi on nakalat sare ghadale set)

त्यावर मीरा पुढे म्हणते, “जेव्हा मी तुम्हाला घरात पाहिलं, तेव्हा माझं असं झालं, बापरे या इथे पण अशाच वागणार की काय? मी गायत्रीला देखील बोलले, यांच्या वाईब्स खूप भारी वाटत आहेत. मी जो विचार केला होता ना तुम्हाला बघून तशा तुम्ही नाहीच आहात किंवा मग बाहेर वेगळं आणि इथे वेगळे वागत आहात.” त्यावर सुरेखा यांनी विचारले तिथे काय झालं होतं? त्यावर मीरा म्हणाली, “तुम्ही माझी बॅग फेकली होती.” हे ऐकून त्यांना देखील धक्का बसला.

https://www.instagram.com/p/CUFRBQ2KBiJ/?utm_medium=copy_link

मीराने याआधी झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिचे पात्र खूप मजेशीर होते. तिचा अभिनय सर्वांना खूप आवडला होता, तर सुरेखा कुडची यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. अनेकवेळा त्या नकारात्मक भूमिकेत दिसल्या आहेत. तरीही प्रेक्षकांमध्ये त्यांचा चांगलाच दबदबा आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ स्पर्धकाचा झालाय दोनदा घटस्फोट, घरात करावा लागतोय पहिल्या पतीशी सामना

-आनंद गगनात मावेना! आधी बॉलिवूडमध्ये पदार्पण अन् आता ‘मल्टीप्लेक्स’चा मालक बनलाय विजय देवरकोंडा

-कपाळावर कुंकू लावून तुरुंगातून बाहेर निघाला राज कुंद्रा, ६४ दिवसांनी मिळाला जामीन

हे देखील वाचा