Tuesday, July 9, 2024

मीझान जाफरीला बिग बींची नात वाटते खूपच ‘आकर्षक’; म्हणाला, ‘नव्या आणि मी खूप…’

ॲक्टर डान्सर जावेद जाफरी यांच्या मुलाने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले की, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही त्याच्या खूप क्लोज आहे आणि त्याला ती खूप आकर्षक वाटते. नुकत्याच झालेल्या या मुलाखतीमध्ये मीझान बहीण अलावियासोबत बोलत होता. जेव्हा अलावियाला विचारले की, मीझान तुझ्या मैत्रिणींना डेट करत असेल, तर तुला कसे वाटेल? तेव्हा मला छान वाटेल असे उत्तर तिने दिले.

मीझानला आकर्षक वाटते नव्या
मीझानने सांगितले की, “नव्या, अलावियाची एक मैत्रीण आहे, जी मला खूप आकर्षक वाटते आणि मी तिच्या क्लोज आहे.” तो पुढे म्हणाला, “मुलींनी मला यासाठी सोडून दिले की, मी एकाच वेळी दुसऱ्या मुलींशी पण बोलायचो.” मुलींच्या टेस्ट विषयी विचारल्यावर मीझानने सांगितले की, “एक फिट टोन्ड बॉडी मला मुलींकडे खूप आकर्षित करते.”

अलावियाला छान वाटते, जेव्हा मीझान तिच्या मैत्रिणींना डेट करतो
मुलाखतीदरम्यान विचारल्यावर अलवियाने सांगितले की, “मला छान वाटते, जेव्हा मीझान माझ्या मैत्रिणींना डेट करतो.” मीझानने हे सुध्दा सांगितले की तो ‘अवेलेबल’ आहे.

मीझानची जवळची मैत्रीण आहे नव्या
मीझानने याआधी नव्याबद्दल बोलताना सांगितले की, “आम्ही एकाच फ्रेंड सर्कलमध्ये आहोत आणि माझ्या छोट्या बहिणीची नव्या बेस्टी आहे व माझी जवळची मैत्रीण आहे. मी कोणासोबतच रिलेशनशिपमध्ये नाही. माझे आई-वडील मला खोदून खोदून विचारतात की, हे सगळं काय चाललं आहे. तेव्हा मी म्हणतो की मलाच काही माहिती नाही.”

काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत मीझानने सांगितले की, “मला समजत नाही की माझ्या लाईफमध्ये हे रिलेशनशिप का तयार होत आहेत. मी सिंगलच आहे.” यावेळी त्याने स्वता:ला सिंगल असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा