Friday, July 12, 2024

आता मुलाबाळांनी कुणाकडं बघायचं! प्रसिद्ध पंजाबी गायकाचे निधन, पोलिसांनी दोघांना केली अटक

पंजाबी संगीतविश्वाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. एकीकडे प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याच्या निधनातून पंजाबी संगीतविश्व सावरले नाहीये, तर दुसरीकडे आणखी एका युवा गायकाने या जगाचा निरोप घेतला आहे. तो गायक म्हणजे निर्वैर होय. मेलबर्न येथे राहणारा पंजाबी गायक निर्वैर सिंग याचे रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. तो आपल्या मागे पत्नी आणि २ मुलांना सोडून गेला आहे. त्याच्या निधनामुळे संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, मेलबर्नमध्ये एका भीषण कार अपघातात निर्वैर सिंग (Nirvair Singh) याचे निधन झाले. या प्रकरणात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी (दि. 30 ऑगस्ट) दुपारी जवळपास 3.30च्या सुमारास डिगर्स रेस्टच्या उपनगरात तीन कार अपघात झाले. हाती आलेल्या वृत्तानुसार, दुर्घटनेनंतर निर्वैर त्याच्या गाडीतच अडकला आणि तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. पोलीस या दुर्घटनेमागील कारणांचा तपास करत आहेत.

निर्वैर याला ‘माय टर्न’ अल्बममधील ‘तेरे बिना’ या गाण्यातून प्रसिद्धी मिळाली होती. दिवंगत गीतकारासोबत आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारा त्याचा जवळचा मित्र आणि पंजाबी गायक गगन कोकरी (Gagan Kokri) याने निर्वैरच्या निधनाची पुष्टी केली. तसेच, सोशल मीडियावर एक भावूक पोस्टही शेअर केली. गगनने निर्वैरच्या आठवणीत भावूक पोस्ट लिहिली आहे.

त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “निर्वैर भाई मी ही बातमी ऐकून आताच उठलोय. आपण टॅक्सीही एकत्रच चालवली, पहिल्यांदा गायलो ते पण एकत्रच अल्बम आणि मला माहितीये तू कामात व्यस्त झालास. तू आयुष्यात खूप चांगलं नाव कमावलं. तुझा शेवटचा कॉल आला, तेव्हा परत गायन सुरू करण्याबद्दल होता. तुझे ‘तेरे बिना’ हे आपल्या ‘माय टर्न’ या अल्बममधील सर्वात चांगले गाणे होते. ज्यातून आपण सर्वांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. वीर तू चांगला माणूस होतास आणि तुझे असे जाणे धक्कादायक आहे. तुझ्या आत्म्याला शांती मिळो भावा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Gagan Kokri (@gagankokri)

या पोस्टसोबतच गगन कोकरी याने दिवंगत निर्वैरसोबत त्याचा एक जुना फोटोही शेअर केला आहे. निर्वैर याचे शेवटचे गाणे ३ वर्षांपूर्वी आले होते. या गाण्याचे नाव ‘हिक्क ठोक के’ असे होते. हे गाणे गुरलेज अख्तर गायिकेसोबत गायले गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आगमन गणपत्ती बाप्पांचं! ‘ही’ गाणी वाजलीच पाहिजेत
रोमांन्स, सस्पेंन्सचा थरार! चुकूनही पाहायला चुकवू नका ‘या’ पाच वेबसिरीज
बेस्ट फिल्म ‘शेरशाह’, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिती सेनन; पाहा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कोणी मारली बाजी

हे देखील वाचा