Tuesday, July 9, 2024

‘ही लज्जास्पद गोष्ट…’, पंतप्रधानांचा फोटो शेअर करत शिवसेनेच्या महिला खासदारांनी व्यक्त केला संताप; काय आहे प्रकरण

सध्या बॉलिवूडमध्ये बॉयकॉट ट्रेंडची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आमिर खानच्या लालसिंग चड्ढा चित्रपटापासून या ट्रेंडची सुरुवात झाली होती. बॉयकॉट ट्रेंडमुळे आमिर खानच्या लालसिंग चड्ढा चित्रपटावर याचा थेट परिणाम झालेला पाहायला मिळाला. फक्त आमिर खानच्या लालसिंग चड्डावर नाही तर अक्षय कुमारच्या रक्षाबंधन चित्रपटालाही बॉयकॉट करण्याची मागणी केली जात होती. यावर अनेकांनी जोरदार टिका केली होती. यामध्ये शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रम्हास्त्र चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आलिया आणि रणबीर कपूर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. मात्र ब्रम्हास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे उजैनमधील महाकाल मंदिरात दर्शनाला गेले असता त्यांना मंदिरात प्रवेश मिळू नये अशी भूमिका बजरंग दलाने घेतली होती. या बातमीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला होता.

आलिया आणि रणबीर कपूरसोबत घडलेल्या या घटनेवर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करत ट्विटरवरुन आपला संताप व्यक्त केला आहे. यामध्ये त्या म्हणतात की, “आता हा फोटो तुमची काहीही मदत करणार नाही. तो शांतच राहील. रणबीर आणि आलियाला उजैनच्या मंदिरात प्रवेश न देणे ही लज्जास्पद बाब आहे. राजकारण किती खालच्या थराला जात आहे हेच यावरुन सिद्ध होते. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी लॉबिंग होेणे हा ट्रेंडच बनला आहे.”

दरम्यान प्रियांका चतुर्वेदी यांच्याप्रमाणेच या सगळ्या प्रकाराबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे. आलिया आणि रणबीरचा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार पद्धतीने सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता नागार्जुनही जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी बनली फिल्म प्रोड्यूसर, ‘या कलाकारवर बनवत आहे बायोपिक
पार्वती मातेची भूमिका साकारत असताना स्टेजवरच आला मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
कॅटरिनाच्या ‘या’ सवयीने वैतागला अभिनेता इशान खट्टर; म्हणाला, ‘तिच्याशी बोलणे म्हणजे भिंतीशी…’

हे देखील वाचा