Tuesday, August 5, 2025
Home अन्य Shocking! मिया खलिफाचा झाला मृत्यु? फेसबुक पेजवरून समोर आली माहिती

Shocking! मिया खलिफाचा झाला मृत्यु? फेसबुक पेजवरून समोर आली माहिती

प्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफा (Mia Khalifa) आपल्या विवादांंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. अनेक विषयांवर ती आपले मत व्यक्त करत असते, ज्यामुळे बऱ्याचदा तिला टीकेचाही सामना करावा लागतो. मध्यंतरी ती पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिल्याने रातोरात प्रसिध्द झाली होती. मात्र आता तिच्या मृत्युच्या बातमीने सगळीकडे खळबळ माजवली आहे. काय आहे या मागील खरे सत्य चला जाणून घेऊ…

मिया खलिफा हे सोशल मीडियावरील एक प्रसिध्द नाव आहे. आपल्या फोटोंमुळे आणि विवादांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र आता समोर आलेल्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण तिच्या अधिकृत सोशल मीडिया पेजमध्ये बदल करत त्याला ‘रिमेंमबरिंग मिया खलिफा’ म्हणजे मिया खलिफाच्या आठवणीसाठी काढलेले पेज असे शीर्षक दिले होते. ज्यामुळे सगळेच गोंधळात पडले होते. मात्र या बदलामुळे तिच्या चाहत्यांना चांगलेच गोंधळात टाकले. कारण तिने प्रोफाईल फोटोही काढून टाकल्याने तिचा मृत्यु झालाय की काय, असाच चाहत्यांना प्रश्न पडला आहे. मात्र हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर मियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन, या सगळ्या अफवा असून ती ठीक असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

मियाच्या या खुलाश्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. काही जणांनी तिचे अकाउंट हॅक झाल्याचा अंदाज लावला, तर काही जणांनी हा सगळा प्रकार फेसबुक टीमच्या चुकीमुळे झाल्याचा निष्कर्ष लावला आहे.

दरम्यान मियाच्या मृत्युची खोटी बातमी यापुर्वीही एकदा समोर आली होती. जून २०२०मध्ये मिया खलिफाने आत्महत्या केल्याची बातमी सोशल मीडियावर प्रसिध्द झाली होती, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. त्यानंतर मियाने याबद्दल अफवा असल्याचे स्पष्टिकरण दिले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा