Friday, October 18, 2024
Home हॉलीवूड ‘किंग ऑफ पॉप’ असणाऱ्या मायकल जॅक्सनवर येणार बायोपिक ‘हा’ कलाकार साकारणार मुख्य भूमिका

‘किंग ऑफ पॉप’ असणाऱ्या मायकल जॅक्सनवर येणार बायोपिक ‘हा’ कलाकार साकारणार मुख्य भूमिका

आपल्या गाण्यांवर संपूर्ण जगाला नाचवणारा तुफान लोकप्रिय असणाऱ्या मायकल जॅक्सनला कोणत्याही विशेष ओळखीची किंवा परिचयाची गरज नाही. डान्स आणि गायनाच्या विश्वातला बेताज बादशाह म्हणून मायकल जॅक्सन ओळखला जातो. त्याने जाऊन अनेक वर्ष झाली. मात्र आजही त्याची क्रेझ किंचितही कमी झालेली नाही. मायकल जॅक्सनचे आयुष्य एक रोलर कोस्टर होते. त्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. नेहमीच तो या ना त्या कारणामुळे चर्चेत राहिला. आजही त्याबद्दल अनेकदा बोलले जाते. आता याच मायकलवर एक बायोपिक येणार आहे. मायकलवर एक सिनेमा काढण्याच्या तयारीला आता वेग आला आहे. नुकतंच या बायोपिकमध्ये मायकलची भूमिका कोण करणार त्या अभिनेत्याचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

‘किंग ऑफ पॉप’ असणाऱ्या मायकल जॅक्सनची भूमिका दुसरा तिसरा कोणी नाही तर त्याचा २६ वर्षीय पुतण्या जाफर जॅक्सन साकारणार आहे. एंटोनी फुक्वा यांचे दिग्दर्शन असलेल्या या ‘मायकल’ सिनेमात जाफर जॅक्सनची निवड मुख्य भूमिकेसाठी केली गेली आहे. ‘मायकल’ सिनेमाची निर्मिती ग्राहम किंग हे करत असून, लायंस गेट यांनी नुकतीच जाफर जॅक्सनच्या नावाची घोषणा केली आहे.

ग्राहम किंग यांनी जाफरबद्दल सांगितले, “मी दोन वर्षांपूर्वी जाफरला भेटलो होतो. त्याने ज्या पद्धतीने मायकलचे व्यक्तिमत्व व्यक्त केले त्यामुळे मी प्रभावित झालो. हे इतके उत्तम होते कि मी जगभरात शोधल्यानंतरही ‘मायकल’ फक्त जाफरचं साकारू शकते हे नक्की होते.” इंस्टाग्रामवर देखील जाफरचं एक ब्लॅक अँड व्हाईट पोस्ट करत याबाबत माहिती दिली गेली. जाफरने देखील त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून काकाची भूमिका मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्याने ट्विटमध्ये लिहिले, “मी माझ्या काकांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी स्वतःला विनम्र आणि सनमानीत समजत आहे. मी लवकरच तुम्हाला भेटेल.”

या सिनेमाच्या घोषणेनंतर जगभरात असणाऱ्या मायकलच्या फॅन्सला सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र हा सिनेमा कधी प्रदसरहित होईल याबाबत अजून माहिती मिळलेली नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांनी हाती बांधले घड्याळ, केला राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ

मेहेंदी सजली! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या हातावर सजली सुमितच्या नावाची मेहेंदी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा