Thursday, November 21, 2024
Home हॉलीवूड तब्बल 150 वर्षे जगण्यासाठी मायकल जॅक्सन झोपायचा ऑक्सिजन बेडवर; बूटामध्ये लपले होते डान्सचे गुपीत

तब्बल 150 वर्षे जगण्यासाठी मायकल जॅक्सन झोपायचा ऑक्सिजन बेडवर; बूटामध्ये लपले होते डान्सचे गुपीत

आपल्या गाण्यांवर पूर्ण जगाला नाचायला लावणारा प्रसिद्ध पॉप गायक म्हणजे मायकल जॅक्सन. त्याच्या डान्स स्टाईलमुळे तो खूपच लोकप्रिय आहे. त्याने जगाला अनेक नवनवीन डान्स स्टाईलची देणगी दिली आहे. त्याचे निधन 25 जून, 2009 मध्ये झाले होते. मायकल जॅक्सन याची आज पुण्यतिथी आहे. अचानक झालेल्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्याचा मृत्यू अगदी संशयास्पद अवस्थेत झाला होता. त्यानंतर त्याच्या मृत्यूवर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मायकल जॅक्सन हा एक असा गायक, गीतकार आणि पॉप डान्सर होता, जो‌ रॉक ऍंड रोल हॉल ऑफ फेममध्ये सामील होता. 29 ऑगस्ट तिचा जन्म दिवस आहे. यानिमित्त जाणून घेऊया मायकल जॅक्सनबाबत काही खास गोष्टी…

अमेरिकेमध्ये इंडियाना प्रांतामधील छोट्याश्या शहरातील गॅरीमध्ये 29 ऑगस्ट, 1958 मध्ये मायकल जॅक्सनचा जन्म झाला होता. तो त्याच्या आई- वडिलांचे आठवे अपत्य होता. त्याला संगीतात रस असल्याने 1964 मध्ये त्याने त्याच्या भावाच्या पॉप ग्रूपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तो टॅम्बोरिन आणि बोंगो वाजवत होता. हळूहळू त्याच्या बॅंडची लोकप्रियता वाढत गेली आणि मायकल जॅक्सनला देखील लोक ओळखायला लागले.

मायकल जॅक्सनचे नाव जगभर तेव्हा प्रसिद्ध झाले, जेव्हा 1982 मध्ये त्याचा अल्बम आला होता. ज्याचे नाव ‘थ्रिलर’ असे होते. या अल्बमने एक नवीन इतिहास रचला होता. हा आतापर्यंतचा सर्वात जास्त विकला जाणारा अल्बम आहे. मायकल जॅक्सनला लोक ‘किंग ऑफ पॉप’ या नावाने ओळखतात. त्याच्या बाबतीत अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. असं म्हणतात की, मायकल जॅक्सनला 150 वर्ष जगायचे होते. यासाठी तो नेहमी ऑक्सिजन बेडवर झोपायचा. तो कुठेही जाताना मास्क वापरत असायचा.

त्याची अनेक वेळा सर्जरी झाली होती. त्याच्या करिअरच्या सुरुवातीला त्याने त्याच्या त्वचेचा रंग बदलण्यासाठी सर्जरी केली होती. त्यानंतर त्याने अनेकवेळा चेहऱ्याची सर्जरी केली. त्यामुळे तो वादात अडकला होता. अनेकांचे असे म्हणणे होते की, त्याला महिलांप्रमाणे राहायला आणि दिसायला खूप आवडते.

मायकल जॅक्सनच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्याने 1994 मध्ये लिसा मेरी प्रिसले हिच्याशी लग्न केले होते. परंतु त्यांचे हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या दीड वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याने 1997 मध्ये नर्स डेबी रोव हिच्याशी लग्न केले. त्या दोघांना दोन मुलं आहेत. प्रिन्स मायकल आणि मुलगी पेरिस मायकल कॅथरीन. त्याचे हे लग्न देखील जास्त काळ टिकू शकले नाही. त्याचा 1999 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर 2009 मध्ये त्याचा मृत्यू झाला.

मायकल जॅक्सनचा 1987 मध्ये प्रदर्शित झालेला म्युझिक व्हिडिओ ‘स्मूथ क्रिमिनल’मध्ये त्याने जी डान्स स्टेप केली होती. ती आजही कोणालाही करणे कठीण आहे. ती स्टेप तो खास सँडलच्या मदतीने करत असे. त्याने जगाला रोबोट आणि मून वॉक यांसारख्या डान्स स्टाईलच नव्हे, तर हिप- हॉप, पोस्ट डिस्को, पॉप आणि रॉक देखील शिकवले आहे. त्याने 13 ग्रॅमी अवॉर्ड, ग्रॅमी लिजंड अवॉर्ड, ग्रॅमी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, 26 अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकले आहेत.

एका वृत्तानुसार, जर्नल आणि न्युरोसर्जरी प्रकाशित झालेल्या एका शोध कार्यात ही गोष्ट सांगितली आहे. अनेक डान्सरने ही स्टेप करण्याचा प्रयत्न केला आहे. ते केवळ 25 ते 30 डिग्रीपर्यंत स्वतःला फिरवू शकते होते. मायकल जॅक्सन हा 45 डिग्रीपर्यंत फिरू शकत होता. मायकल जॅक्सनचे सँडल खास पद्धतीने डिझाईन केले होते. ज्यामध्ये ‘वी’ आकाराचा एक तुकडा लावला होता.(Michael Jackson’s death anniversary let’s know some fact about his life)

अधिक वाचा- 
बोल्ड अँड ब्यूटीफुल! दुबईच्या रस्त्यांवर नेहाचा हटके अंदाज, पाहा फोटो
जयश्री गडकरांनी वयाच्या 13व्या वर्षीच केले अभिनयात पदार्पण; तर सर्वांपासून लपूनछपून नेहमी करायच्या ‘हे’ काम

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा