गेल्यावर्षी देशावर कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे कोणतेच खास प्रसंग आपल्या जवळच्या माणसांसोबत साजरे करता आले नाहीत. असेच काहीसे मनोरंजन विश्वात देखील घडले आहे. अभिनेता राणा डग्गुबती आणि मिहिका बजाज यांचे गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात लग्न झाले होते. कोरोनामुळे दोघांच्या लग्नाला फार कमी लोक उपस्थित होते. मात्र, त्यांच्या लग्नाच्या विधींमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. नुकताच मिहिकाने तिच्या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने राणासाठी एक रोमँटिक पोस्ट लिहिली आहे.
राणा डग्गुबतीबद्दल सांगितली ‘ही’ गोष्ट
या पोस्टमध्ये मिहिकाने राणा डग्गुबतीचे कौतुक करत व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा तुम्हाला एका व्यक्तीमध्ये सर्वकाही मिळते. प्रेम, प्रकाश आणि जीवन! राणा दग्गुबती तू माझे सर्वस्व आहेस.” मिहिका बजाजची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहे.
व्हिडीओद्वारे दाखवली लग्नाची झलक
मिहिकाने तिच्या या व्हिडिओद्वारे चाहत्यांना तिच्या लग्नाची सुंदर झलक दाखवली. कोरोना विषाणूमुळे या दोघांच्या लग्नाला फक्त ३० लोक उपस्थित होते. या व्हिडिओमध्ये त्यांच्या हळदी समारंभापासून ते मेहंदी समारंभ आणि फेऱ्या घेण्यापर्यंतचा प्रत्येक तपशील समाविष्ट केला आहे. यात राणा मंगळसूत्र घातल्यानंतर मिहिकाला अतिशय रोमँटिक स्टाईलमध्ये किस करताना दिसत आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल
राणा आणि मिहिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. राणा डग्गुबती आणि मिहिकाचे लग्न खूप चर्चेत राहिले. तिच्या या रोमँटिक व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
८ ऑगस्ट रोजी झाला होते लग्न
राणा डग्गुबती दाक्षिणात्य चित्रपटातील अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसला आहे. ‘बाहुबली’ चित्रपटात त्याने भल्लालदेवाची भूमिका साकारली होती. जी एक नकारात्मक व्यक्तिरेखा होती आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. राणा डग्गुबतीने ८ ऑगस्ट २०२० रोजी हैदराबादमधील रामनायडू स्टुडिओमध्ये त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत लग्न केले. मिहिका व्यवसायाने इव्हेंट प्लॅनर आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा
-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ
-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल