मिका सिंगचे (mika singh) स्वयंवर दोन महिन्यांहून अधिक काळ चर्चेत होता, अखेर आता गायकाला त्याची वधू मिळाली आहे. होय, माध्यमातील वृत्तानुसार, मिका सिंगने आपली जुनी मैत्रिण आकांक्षा पुरी हिची निवड केली आहे. या स्वयंवरमध्ये आकांक्षाने प्रणितिका दास आणि नीत महल यांना मागे टाकत गायकाच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले मिकाला तिन्ही मुली खूप आवडत होत्या, पण त्याला वाटत होतं की आकांक्षा त्याच्यासाठी बेस्ट आहे. आकांक्षा आणि मिका सिंग हे खूप दिवसांपासून एकमेकांचे मित्र असल्याची माहिती आहे.
अशा परिस्थितीत, गायकाने मिका दी वोटीच्या फिनालेमध्ये आकांशाची निवड केली, त्यानंतर प्रणितिका आणि नीत महलचे हृदय थोडे दुखले असेल. मात्र, मिका सिंग स्टेजवर आकांक्षा पुरीसोबत लग्न करणार नाही. गायकाने आकांक्षाला हार घातला कारण ती त्याला आवडते. मिका सिंगने सांगितले की, मला आकांक्षासोबत कॅमेर्यामागे दर्जेदार वेळ घालवायचा आहे आणि त्यानंतर सात फेरे घेईन. इतकंच नाही तर मिकाने आकांक्षाच्या कुटुंबियांचीही भेट घेतली आणि सर्वांचे आशीर्वाद घेत त्याने अभिनेत्रीसोबत नवीन प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आकांक्षा पुरी, जी गेल्या १३ आणि १४ वर्षांपासून मिका सिंगची मैत्रिण आहे, तिने मिका दी वोटीमध्ये वाइल्ड कार्ट स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता.
https://www.instagram.com/reel/CgUeyiElt7X/?utm_source=ig_web_copy_link
यादरम्यान तिने खुलासा केला की, जेव्हा तिने मिका सिंगला इतर मुलींसोबत पाहिले तेव्हा तिला जाणवले की तिला गायक गमावायचे नाही. आकांक्षाने असेही सांगितले की, तिने स्वतः चॅनलशी संपर्क साधला की तिला शोमध्ये प्रवेश करायचा आहे. आकांक्षाने असेही सांगितले की, ती फक्त तिच्या राजाची राणी बनेल, या वचनासह तिने शोमध्ये प्रवेश केला. आकांक्षा पुरी याआधी बिग बॉस फेम पारस छाब्राला डेट केल्यामुळे चर्चेत होती. कारण बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यानंतर पारस माहिरा शर्माच्या प्रेमात पडला आणि दोघांचे ब्रेकअप झाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा चाहत्याने फेकून दिला होता महमूद यांचा ऑटोग्राफ,,धर्मेंद्र यांनी शेअर केला ‘तो’ मजेशीर किस्सा
विकी कौशलची क्रेझच निराळी! सेल्फी मिळेना म्हणून चाहतीने चक्क दिला बोहल्यावर चढण्यास नकार
घटस्फोटानंतर १० महिन्यांनी नागा चैतन्यने केले मन मोकळे, सांगितली ‘ती’ भयाण गोष्ट










