बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक म्हणून मिका सिंगची ओळख आहे. तो जेवढा त्याच्या गाण्यांमुळे ओळखला जातो, तेवढाच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील गाजताना दिसतो. अशातच मिका सिंग आणि राखी सावंत यांचे २००६ सालातले जबरदस्तीचे किस प्रकरण अजूनही चालूच आहे. आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. मिकाने या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने १७ वर्षांपूर्वी राखी सावंतने तिला मिकाने जबरदस्तीने किस केल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आता हीच एफआयआर कोर्टाने रद्द करण्यासाठी अपील केले आहे.
एका माहितीनुसार मिकाने दावा केला आहे की, राखी आणि त्याने एसी सहमतीने त्यांच्यात असणारे मतभेद सोडवले आहेत. सध्या राखी तिच्या व्यवसायिक कामांमध्ये व्यस्त असून, मीकाच्या विरोधात तिने केलेली तक्रार मागे घेण्यात तिला काहीच समस्या नसल्यचे देखील मिकाने दाखल केलेल्या अपीलमध्ये सांगण्यात आले आहे.
एका मोठ्या वृत्तपत्राच्या माहितीनुसार जस्टीस गडकरी आणि पीडी नाईक यांना राखी सावंतचे वकील असणाऱ्या आयुष्य पसबोला यांनी सांगितले की, दोघांमध्ये असणारे भांडण मिटले आहे, आणि राखीला मिकांविरोधातील तक्रार रद्द करण्यात काहीच आपत्ती नाही. आयुष यांनी हे देखील सांगितले की ही केस रद्द करण्यासाठी देण्यात आलेला हलफनामा हायकोर्टातील रजिस्ट्रीमधून गायब झाला आणि अनट्रेसेबल ठरला. आता कोर्टाने तिला नवीन हलफनामा दाखल करण्यासाठी एक आठवडाची मुदत दिली आहे.
दरम्यान ११ जून २००६ रोजी मिका सिंगने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत राखीच्या परवानगीशिवाय तिला सर्वांसमोर किस केले होते. याचे व्हिडिओ आणि फोटो खूपच गाजले आणि यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर राखीने मिका विरोधात तक्रार दाखल केली होती. मिकाला कोर्टाने १७ जून २००६ रोजी अग्रीम जमीन मंजूर केला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिक्स पॅक्सला व्हीएफएक्स म्हणणाऱ्या ट्रोलर्ससाठी शर्टलेस झाला सलमान, फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी
भरलेल्या स्टेडियममध्ये अभिषेकवर चिडली ऐश्वर्या; भाची नव्यावर देखील दाखवला राग, व्हिडिओ व्हायरल