Saturday, July 6, 2024

Bigg Boss OTT: घरात फुलणार अक्षरा- मिलिंदची मैत्री, नव्या कनेक्शनमुळे चाहते झाले आनंदी

बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. सध्या ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. दरम्यान घरात बरेच बदल दिसून येत आहेत. गेल्या आठवड्यात जीशान खानने आपल्या जोडीदाराला सोडले आणि दिव्या अग्रवालसोबत एक नवीन जोडी बनवली. तर आता घरात आणखी एक नवीन जोडी तयार झाली आहे आणि ती म्हणजे पंजाबी गायक मिलिंद गाबा आणि भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग यांची. बिग बॉसच्या तिसऱ्या आठवड्यातही शोमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळाले.

प्रतीक सहजपाल- नेहा भसीन यांनी केली जोडीदाराची फसवणूक
खरं तर नेहा भसीन आणि प्रतीक सहजपाल यांनी आपापल्या जोडीदाराला सोडून एकमेकांशी एक नवीन जोडी केले. इतकेच नव्हे तर या गोष्टीमुळे प्रतीक सहजपाल आणि अक्षरा सिंगच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. त्याचबरोबर मिलिंद गाबाच्या चाहत्यांनाही या गोष्टीचा धक्का बसला आहे. प्रतीक सहजपालला त्याच्याच चाहत्यांनी सोशल मीडियावर अक्षराची फसवणूक केल्याबद्दल प्रतिक्रिया देत, तो चुकीचा असल्याचे सांगितले होते. हा ट्विस्ट ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात कनेक्शन टास्कसह आला आहे. (Milind and Akshar’s friendship will blossom in the house of Bigg Boss OTT)

काय होता नवीन टास्क?
बिग बॉसच्या घरात जेव्हाही नवीन टास्क खेळला जातो, तेव्हा त्याचा थेट परिणाम घरातील सदस्यांच्या नात्यावर होत असतो आणि हे काही नवीन नाही. या आठवड्यातही घरात असेच काहीसे घडताना पाहायला मिळाले. जिथे बिग बॉसने ‘गेम ऑफ हार्ट्स’चे नवीन टास्क कुटुंबातील सदस्यांना दिले होते. हे टास्क घरातील महिला स्पर्धकांनी करायचे होते, असे बिग बॉसने सांगितले होते. टास्क असा होता की मुलींनी हृदयाच्या आकाराचे कार्ट बोर्ड शीट एका मुलाला द्यायचे होते, ज्यांच्याशी त्यांना त्या घरात नवीन कनेक्शन करायचे होते. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांना हा देखील पर्याय होता की, जर त्यांना त्यांच्या जोडीदारासोबत राहायचे असेल तर ते राहू शकतात.

नेहाने- प्रतिकची नवीन जोडी
प्रतीकने अक्षराची एकदा नव्हे तर दोनदा फसवणूक केली. नेहा भसीनने प्रतीकला टास्क दरम्यान तिचे नवीन कनेक्शन असल्याचे सांगितले. वेळ न घालवता प्रतीकने नेहा भसीनने दिलेले हृदय स्वीकारले आणि घरात तिच्याशी एक नवीन कनेक्शन जोडले. त्यानंतर अक्षरा सिंगने मिलिंद गाबाला नवीन कनेक्शनसाठी विचारले सांगितले. मिलिंद गाबाचे चाहते यामुळे खुश आहेत, तर प्रतीक सहजपालवर सोशल मीडियावर अक्षराला फसवल्याबद्दल टीका केली जात आहेत.

नेहा भसीन देखील ट्रोल झाली
मिलिंद गाबाला सोडल्याबद्दल केवळ प्रतीकच नाही, तर नेहा भसीनवरही सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू झाली. परंतु अक्षरा आणि मिलिंद गाबाच्या चाहत्यांनी ते सकारात्मक घेतले आणि मिलिंद गाबा- अक्षराला घरात नवीन कनेक्शन मिळाल्याबद्दल ते खूप आनंदी आहेत. नेहासोबत राहून मिलिंद गाबा आपला गेम नीट खेळू शकत नाही, असे काही चाहत्यांना वाटत होते. आता अक्षराशी संबंध जोडल्यानंतर लोकांना त्याचा खेळ पाहायला मिळेल.

आता हे पाहणे महत्वाचे आहे की, मिलिंद आणि अक्षरा एकत्र कसे खेळतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी

हे देखील वाचा