Wednesday, July 3, 2024

स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसले मिलिंद गाबा, नेहा भसीन अन् निशांत; व्हिडिओला मिळतेय पसंती

वूट ऍपवर प्रदर्शित होणाऱ्या ‘बिग बॉस ओटीटी’ या शोचा पहिला आठवडा पूर्ण झाला आहेत. नुकतेच या शोचा पुढील आठवडा सुरू झाला आहे. करण जोहर सूत्रसंचालीत या शोचे प्रत्येक भाग अनेक चाहते न चुकता बघतात. वूटच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर बिग बॉसच्या घरातील काही किस्से दाखवले जातात. प्रेक्षकांची इथे देखील त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला चांगलीच पसंती मिळते.

खरं तर बिग बॉस सर्वात जास्त वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. परंतु प्रेक्षकांना त्या घरातील स्पर्धकांची भांडणे पाहायला फार आवडतात. सध्या यातील काही स्पर्धकांचा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मिलिंद गाबा, निशांत भट्ट आणि जीशान खान पूल पार्टी करताना दिसत आहेत. या तिघांना मस्ती करताना पाहून नेहा भसीन देखील त्यांच्यात सामील झाली आहे. (Milind Gaba, Neha Bhasin and Nishant were seen having fun in the swimming pool watch video)

सुरुवातीला नेहा भसीन, मिलिंद गाबा, निशांत भट्ट आणि जीशान खान हे स्विमिंग पूलमध्ये असतात. नंतर नेहाने रिद्धिमालादेखील बोलावते. परंतु तिने चांगला ड्रेस परिधान केला होता त्यामुळे ती नकार देते.

या सर्वांना मस्ती करताना पाहून करण नाथ देखील त्यांच्यात सामील होतो. बिग बॉसमध्ये सर्वच स्पर्धक आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रोज काही ना काही नवीन गोष्टी करत असतात. इथे रोज वेगवेगळे टास्क करताना अनेकांची मोठी भांडणे देखील होतात. बिग बॉस ओटीटी आता लवकरच संपणार असून बिग बॉस १५वे पर्व सुरू होणार आहे. या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. तसेच हा शो आता टीव्हीवर देखील पाहता येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकिनी परिधान करून ज्यूस काढताना दिसली जान्हवी कपूर; मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

-जेव्हा गाणे गाताना अचानक ओरडली मिताली, पाहुन सिद्धार्थही झाला स्तब्ध; मग पुढे…

-रितेश अन् नीलमचं ‘मटक मटक के’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले ‘एवढे’ व्ह्यूज

हे देखील वाचा