Saturday, July 6, 2024

‘Rejection माझ्यासाठी नवीन नाही’ मिलिंद गवळी यांनी शेअर केला गोवलकर गुरुजींच्या ऑडिशनचा अनुभव

आई कुठे काय करते? या मालिकेत झळकणाऱ्या मिलिंद गवळी यांना त्यांच्या ‘अनिरुद्ध’ या भूमिकेने मोठी ओळख मिळवून दिली. मिलिंद गवळी मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसत असले तरी त्यांची लोकप्रियता अमाप आहे. त्यांच्या लोकप्रियतेमध्ये महत्वाची भूमिका बाजवतात त्या त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारे मिलिंद गवळी नेहमीच विविध पोस्ट शेअर करत फॅन्सच्या संपर्कात असतात. आता देखील ते एका पोस्टमुळेच चर्चेत आले आहे. मात्र ही पोस्ट त्यांच्या इतर पोस्टपेक्षा जरा वेगळी आहे.

एका खूपच मोठ्या भूमिकेबद्दल त्यांना ऑडिशनसाठी विचारणा झाली, त्यानंतर काय झाले, ती भूमिका कोणती होती? याबद्दल त्यांनी सविस्तर त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. मिलिंद गवळी यांनी या पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एक फोटो आणि एकीकडे त्यांचा सेम लूक दाखवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “मागच्या आठवड्यात कोणाचातरी फोन आला, ते म्हणाले एका चित्रपटासाठी श्री. माधवराव गोवलकर गुरुजींच्या भूमिकेसाठी तुम्ही ऑडिशन द्याल का, ऑडिशन म्हटलं की मी आधीच नाही म्हणून सांगतो, पण ऑडिशन कोणासाठी ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोविलकर गुरुजी यांच्या भूमिकेसाठी, (माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ . हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते. )

मी म्हटलं देतो ऑडिशन, ते म्हणाले getup वगैरे ची काही गरज नाही तुम्ही सेल्फ टेस्ट मोबाईलवर शूट करून पाठवा, पण मला तो गेटअप करावासा वाटला म्हणून मग मी आमचे मेकअप मन समीर म्हात्रे यांना म्हटलं सुट्टीच्या दिवशी आपण गुरुजींसारखा गेटअप करायचा प्रयत्न करूया.

सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आम्ही ती ऑडिशन शूटिंग संपवली, त्या कास्टिंगच्या गृहस्थाला तो व्हिडिओ पाठवून दिला, चार दिवसांनी त्याचा मेसेज आला की गुरुजींच्या भूमिकेसाठी तुमची निवड झाली नाही. Rejection हे माझ्यासाठी काही फार नवीन नाही आहे,आणि कलाकार म्हटलं की रिजेक्शन हा त्याच्या नशिबाला जडलेला प्रकार आहे. पण निदान चार तास का असेना अशी भूमिका जगायला मिळाली हे पण एक कलाकार म्हणून माझं भाग्यच आहे असे मी समजतो.

एका आयुष्यामध्ये इतके विविध आयुष्य जगायला मिळणं हे फक्त एका कलाकाराच्याच भाग्यात असतं. माझ्या भाग्यात होतं म्हणून “ आई कुठे काय करते “ मालिकेमधली अनिरुद्ध देशमुख ची भूमिका अजूनही जगतो आहे.

नाहीतर आयुष्यामध्ये कधी त्याच्यासारखं तिरसट वागता आलं असतं, किती कमी कलाकारांच्या वाटेला अशी , इतक्या विविध छटांनी भरलेली भूमिका येत असेल”. मिलिंद यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी त्यांचे कौतुक करत त्यांच्या अभिनयाला सर्वोत्कृष्ट म्हटले आहे.

हे देखील वाचा