Friday, August 1, 2025
Home मराठी ‘श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं’ मिलिंद गवळी यांच्या ‘त्या’ पोस्टने जिंकली नेटकऱ्यांची मने

‘श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं’ मिलिंद गवळी यांच्या ‘त्या’ पोस्टने जिंकली नेटकऱ्यांची मने

अभिनेते मिलिंद गवळी हे सतत त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे गाजत असतात. आई कुठे काय करते या मालिकेमुळे त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली आहे. नकारात्मक भूमिका असूनही त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असून ते सतत त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांना येणारे विविध अनुभव, भावना या माध्यमाचा वापर करत व्यक्त करत असतात. मिलिंद गवळी यांच्या पोस्ट तुफान गाजतात देखील. त्यांच्या पोस्टची वाट बघणारे सुद्धा अनेक लोकं आहेत.

मिलिंद यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांचा गो शाळेतील अनुभव अतिशय सुरेख लिहिला आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते गो शाळेत गायींसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “हंबरून वासराले चाटती जवा गाय,
तिच्यामंध्ये दिसती मले तवा माझी माय “.
काही दिवसांपूर्वी रावेत पुण्याचे श्री रविशंकर सहस्त्रबुद्धे यांच्या गोशाळेत जाण्याचा योग आला, ते भारता मधले प्रख्यात pure breed गीर गाईंच्या जातीचे संशोधक, अभ्यासक आहेतच, आणि त्यांच्या गो शाळेमध्ये शंभरहून अधिक गीर जातीच्या गायी आहेत , अतिशय सुंदर पद्धतीने त्यांच्या कडे त्या गाईंची निगा ठेवली जाते, ते सगळं पाहून मन भारावून गेलं आणि भरूनही आलं,

श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं, आणि माझ्या नावातच गवळी आहे, त्यामुळे गाईंच्या सानिध्यात राहणं माझा अधिकारच आहे, कदाचीत म्हणून च गाईंच्या सानिध्यात माझं मन रमतं, आणि रविशंकर यांसारख्ये व्यक्ती ज्यांना गाईन विषयी एवढं ज्ञान आहे, आणि खूप छान पद्धतीने ते गाईंची काळजी घेतात, त्यामुळे त्यांच्याबद्दलचं माझं प्रेम आणि आदर खूप खूप वाढला आहे. त्यांची गोशाळा बघून , त्यांचं ज्ञान जाणवून त्यांच्याबद्दल मला खूप हेवा वाटला, आपण गवळी असून आपल्याला या जन्मात असं काही जमणार नाही याचीही खंत वाटली.

त्या आधी एकदा इस्कॉनच्या गोवर्धन आश्रमात जाण्याचा पण योग आला होता, तिथेही गाईंची निगा फार छान पद्धतीने ठेवली जाते, आणि माझा कॉलेजचा मित्र जो आता प्रसिद्ध निर्माता आहे शशांक सोळंकी , त्याने त्याच्या वाड्याला असलेल्या फॉर्मवर गाय पाळली आहे, खरंच मला हेवा वाटतो हा सगळ्या गोष्टींचा.

आजच्या काळामध्ये शहरात राहणाऱ्या लाल गाईला घरी आणणं, ही तर अशक्य गोष्ट वाटते. पूर्वीच्या काळी गावात प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच, असं म्हटलं जायचं ज्याच्या घरी गाय आहे, त्याच्या घरी मुलं बाळ दुष्काळात पण उपाशी राहणार नाहीत, आपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात , गाईची पूजा केली जाते, कितीतरी वेळेला माझ्या आईने मला गाई साठी काढून ठेवलेला नैवेद्य “गाईला भरून ये असं सांगितलं” आणि मी मोटरसायकल वर्रून गाय शोधत अनेक वेळेला फिरलेलो आहे. माहींमच्या शितळादेवी मंदिरात गाय वाल्या मावशी आणि माझी चांगली ओळखही झाली होती.

माझ्या आईची गाई वर खूप श्रद्धा होती. रविशंकरांबरोबर चर्चा करत असताना लक्षात आलं की , आपल्या देशात अनेक ठिकाणी अजूनही गायांची फार काळजी घेतली जात नाही”.

मिलिंद गवळी यांनी या पोस्टमधून गो शाळा चालवणाऱ्या अनेकांचे कौतुक करत अद्यापही काही ठिकाणी गायींची काळजी घेतली जात नसल्याची खंत देखील व्यक्त केली आहे. दरम्यान अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मिलिंद यांना आई कुठे काय करते या मालिकेने यशाच्या शिखरावर नेऊन बसवले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी कपूरने बहिणीसोबत घेतला तिरुमला बालाजीचा आशीर्वाद, मंदिरातील दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल

पहिल्याच भेटीत पल्लवीने विवेकला समजले होते गर्विष्ठ, मात्र पुढे दिग्दर्शक आणि अभिनेत्रींमध्ये फुलली प्रेमकथा

हे देखील वाचा