Wednesday, July 3, 2024

“मराठीचा प्रोड्युसर आणि एक शेतकरी याच्यामध्ये साम्य” मराठी अभिनेत्याने केलेली ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

अभिनेते मिलिंद गवळी हे त्यांच्या सुपरहिट अशा आई कुठे काय करते? या मालिकेसोबतच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील तुफान गाजत असतात. मागील अनेक वर्षांपासून मनोरंजनविश्वात असणाऱ्या मिलिंद यांना या मालिकेने एक वेगळी ओळख आणि करियरला एक सुखद वळण मिळवून दिले. आज मिलिंद यांचे नाव उच्चारताच त्यांची अनिरुद्ध देशमुख ही भूमिका डोळ्यासमोर उभी राहते. नकारात्मक भूमिकेतूनही त्यांनी त्यांचा प्रेक्षक जपला आहे. मिलिंद यांचा विशेष गुण म्हणजे त्यांच्या अतिशय सुंदर आणि वाचनीय अशा सोशल मीडिया पोस्ट.

मिलिंद गवळी यांच्या सोशल मीडिया पोस्टची वाट तर त्यांचे फॅन्स आतुरतेने बघत असतात. नुकतीच त्यांनी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी अभिनेता आणि शेतकरी यांची सुरेख तुलना केली आहे. मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “शेतकरी आणि कलाकार

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)


या दोघांमध्ये काय साम्य आहे ?
दोघांमध्ये साम्य आहे का नाही आहे?
मला असं वाटतं या दोघांमध्ये खूप साम्य आहे.
दोघेही आयुष्यात खूप मोठी रिस्क घेतात,
दोघांच्याही आयुष्यामध्ये यश अपयश हे त्यांच्या हातात नसतं,
शेतकऱ्यासाठी वेळेवर पेरणी झाली वेळेवर पाऊस झाला तरच त्याला यश मिळू शकतो, कलाकारासाठी पण योग्य ती भूमिका मिळाली, या पद्धतीने साकारता आली आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली, शिक्षकांना ती आवडली, तरच त्याला यश मिळतं.
अतोनात कष्ट करणे या दोघांच्या नशिबात आहे,
पण कष्ट केल्यामुळे त् या दोघांनाही त्याचं यश मिळेलच याची शाश्वती नाही.
दोघांकडेही खूप आदरणीय आणि कौतुकाने पाहिलं जातं,
लोकांना किंवा प्रेक्षकांना त्यांच्या कष्टाची जाणीव असते,
पण दोघेही एकदा मार्केटमध्ये आले की त्याची किंमत लावली जाते, कधी कधी तर त्या सगळ्या कष्टाची किंमत शून्य होऊन जाते, कित्येकदा शेतकऱ्याचा माल रस्त्यावर शेतकरी फेकून देतो, कारण मार्केटमध्ये त्याच्या मालाला काहीच भाव मिळत नाही. तसंच लाखो करोडो चा सिनेमा कोणीही विकत घ्यायला तयार नसतो थेटरमध्ये तो लागत नाही आणि त्या सिनेमाची किंमत शून्य होऊन जाते.
किंवा एक मराठी सिनेमा चा producer आणि शेतकरी हजार हून अधिक सिनेमे जे बनवून तयार आहेत सेन्सर झालेले आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्याची किंमत शून्य झालेली आहे, एक मराठीचा प्रोड्युसर आणि एक शेतकरी याच्यामध्ये फारसा फरक मला जाणवत नाही.
लोकांनी त्याला आधार द्यायचा म्हटलं तरी सुद्धा ते शक्य होत नाही, शासनाच्या असंख्य schemes, subsidies
फक्त कागदावरच छान छान दिसतात, आकर्षक दिसतात, याचा प्रत्यक्ष न शेतकऱ्याला मराठी प्रोड्युसराला फायदा होतो,
उगाच का इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, उगाच का एक प्रोड्युसर मराठी चित्रपट बनवतो आणि नंतर तो कालबाह्य किंवा गायब होतो तो कधी कोणाला दिसतच नाही त्याचं, त्याच्याबद्दल कोणालाही कधीही काही माहिती नसते,
याचं माझ्या मते मुख्य कारण काय असेल तर ज्या माणसाला कृषी विभाग दिला जातो, कृषिमंत्री केलं जातं, कृषी विभागाचे सेक्रेटरी वगैरे असतात, त्यांचा शेतीशी काही संबंध नसतो, ती कधीही शेतात राबलेले नसतात शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्याच त्यांना कळत नाही माहित नसतात, आणि तसंच सांस्कृतिक विभागात तीच परिस्थिती आहे, जर असं केलं तर सांस्कृतिक मंत्री त्यालाच बनवायचं, त्याचा कलेशी संबंध आहे,
संस्कृती विभागात त्यालाच अपॉइंट करायचं त्याला क्लासिकल डान्स येतो, तो एक कलाकार आहे, आणि त्याला ऍडमिनिस्ट्रेशन पण येतं”.

दरम्यान मिलिंद यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत कलाकारांच्या आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करियरच्या टॉपवर घेतलेले लग्नाचा निर्णय आणि अमेरिकेतील जीवनशैली, अश्विनी भावे यांनी सांगितला त्यांचा हा प्रवास

अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ कृतीमुळे अभिनेते मेहमूद झाले होते आपल्याच मानसपुत्रावर नाराज, स्वतःच केला होता खुलासा

हे देखील वाचा