वयाच्या ५२व्या वर्षी लग्न केलेला अभिनेता मिलींद सोमण म्हणतोय, जगात सर्वकाही फिरलो परंतू माझी आवडती जागा आहे…


मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांची बॉलिवूडमधील अत्यंत रोमँटिक आणि लोकप्रिय जोडी म्हणून ओळख आहे. ते त्यांचे कपल गोल सेट करतानाही दिसले आहेत. त्या दोघांमधील केमिस्ट्री आणि बॉन्डिंग देखील खूप भक्कम आहे. याच दर्शन वेळोवेळी प्रेक्षकांना होतं असतं. नुकतेच दोघांच्या नात्याला सात वर्ष पूर्ण झाले आहे. या निम्मीत मिलिंदने सोशल मीडियावर एक रोमँटिक पोस्ट केली आहे.

मिलिंद आणि अंकिता यांच्या लग्नाला लवकरच तीन वर्ष पूर्ण होणार आहेत. त्याच्या आधी पासून ते दोघे चार वर्ष रिलेशनमध्ये होते आणि नंतर जाऊन त्यांनी लग्न केले. असे त्यांच्या नात्याला एकंदरीत सात वर्ष पूर्ण झाले आहेत. मिलिंदने अंकिता सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून सांगितले आहे की, “अंकिता माझ्या प्रत्येक पावलावर माझी साथ देते.”

मिलिंद यांनी लिहिले आहे की, “पूर्ण दुनियेत सात वर्षाचा प्रवास एकत्र केल्यानंतर, समुद्राच्या खोली पासून ते पर्वताच्या उंचीपर्यंत, पूर्ण जग फिरल्यानंतर, अनेक जंगले फिरल्यानंतर, जहाजांनी प्रवास केल्यानंतर मला हे जाणवले की, माझ्या आयुष्यातील आवडती जागा फक्त तुझ्या मिठीत आहे. जिथे मी आरामात माझं मन मोकळे करू शकतो. जिथे मला समाधान मिळते.”

दुसरीकडे अंकिताने त्यांचे अनेक रोमँटिक फोटो पोस्ट करून लिहले आहे की,” सात वर्ष पूर्ण झाले, परंतु असं वाटत आहे की, आपण भेटुन अगदी काहीच क्षण उलटलेत. मी अशी आशा करते की, असे सुंदर क्षण आपल्या आयुष्यात नेहमी येत राहो, खूप धन्यवाद की तू आहे तसाच राहिलास.”

त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल सांगायचे झाल्यास, मिलिंदने वयाच्या 52 व्या वर्षी अंकितासोबत लग्न केले आहे. तेव्हा अंकिता 26 वर्षाची होती. त्यांच्या वयाला घेऊन त्यांना सोशल मीडियावर खूपच ट्रेंड करण्यात आले होते. मिलींदने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, जेव्हा तो अंकिताला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा त्याला लग्न करण्यात काहीच रस नव्हता. परंतु चार वर्षांच्या रिलेशननंतर त्यांना असे जाणवले की, ते एकमेकांशिवाय जगू शकत नाही, म्हणून त्यांनी नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.


Leave A Reply

Your email address will not be published.