Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड तरुणांनाही लाजवेल अशी आहे मिलिंद सोमण यांची हॉटनेस, जोरदार व्हायरल होतोय ‘हा’ लूक

तरुणांनाही लाजवेल अशी आहे मिलिंद सोमण यांची हॉटनेस, जोरदार व्हायरल होतोय ‘हा’ लूक

बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण नेहमी काही न काही कारणामुळे चर्चेत राहतात. कधी त्यांच्या फिटनेसबाबत तर कधी त्यांच्या बोल्ड स्टाईलने ते नेहमी चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधत असतात.

दरम्यान एमटीव्हीचा शो ‘सुपरमॉडेल ऑफ द इयर २’ चांगलाच चर्चेत आला आहे. दर आठवड्याला हा शो प्रेक्षकांसाठी खास असतो, कारण मलायका अरोरा आणि मिलिंद सोमण एका नवीन लूकमध्ये दिसतात. सोबतच दोघे त्यांच्या जबरदस्त रॅम्प वॉकने जलवा करताना दिसत असतात. (milind soman hot look in mtv show supermodel of the year)

नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो रिलीझ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रोमोमध्ये मिलिंद सोमण अशा लूकमध्ये दिसत आहेत की, प्रेक्षकही त्यांचे भरभरून कौतुक करत आहेत.

मिलिंद यांच्या हॉट लूकमुळे हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता स्पर्धकांसोबत वेगवेगळ्या प्रकारे पोझ देताना दिसत आहे. मलायका अरोरा देखील त्यांचे एक्सप्रेशन्स आणि वॉक पाहून, त्यांच्याकडे बघतच राहते.

मिलिंद यांच्या याच निराळ्या अंदाजामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे. आतापर्यंत ५० हजारांहून अधिक युजर्सने हा व्हिडिओ पाहिला आहे. युजर्स कमेंट करून मिलिंद यांच्या बॉडी आणि हॉट स्टाईलचे कौतुक करत आहेत. अनेक युजर्स असेही म्हणत आहेत की, कोणत्याही मॉडेलसाठी मिलिंद सोमण यांना टक्कर देणे अशक्य आहे.

मिलिंद सोमण यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ते शेवटचे ‘पौराशपूर’मध्ये दिसले होते. शिवाय मलायका अरोरा देखील वेगवेगळे शो जज करत राहते. काही दिवसांपूर्वी काळापूर्वी ती ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ हा शो जज करताना दिसली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी’मध्ये पाहायला मिळाला सोनाली पाटीलचा कोल्हापुरी रांगडा बाज; केली ‘या’ स्पर्धकांची नक्कल

-‘सांग काम्या हो नाम्या’ कार्यात महिलांचे नखरे पुरवताना पुरुषांच्या नाकी नऊ, तर जय दुधानेला आले रडू

-‘…आणि आम्ही हो म्हणालो,’ अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी चाहत्यांना दिली ‘ही’ गोड बातमी

हे देखील वाचा