Saturday, June 21, 2025
Home अन्य बिग बॉस ओटीटी फेम गायक मिलिंद गाबाने केला साखरपुडा, व्हिडिओ आणि फोटो झाले व्हायरल

बिग बॉस ओटीटी फेम गायक मिलिंद गाबाने केला साखरपुडा, व्हिडिओ आणि फोटो झाले व्हायरल

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि बिग बॉस ओटीटी फेम मिलिंद गाबा (Millind Gaba) येत्या १६ एप्रिल रोजी त्याची गर्लफ्रेंड असलेल्या प्रिया बेनीवालसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. सध्या त्याच्या लग्नाच्या आधीच्या सर्व विधींना सुरुवात झाली आहे. ११ एप्रिल रोजी मिलिंद आणि प्रियाने साखरपुडा केला आहे. या साखरपुड्यानंतर या दोघांनी जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी कॉकटेल आणि संगीत पार्टीचे आयोजन केले होते. मिलिंद आणि प्रियाच्या या पार्टीसाठी भूषण कुमार, मीका, गुरु रंधावा, सपना चौधरी, सुरेश रैना, प्रिंस नरूला, सुयश राय आदी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

सध्या सोशल मीडियावर मिलिंद गाबा आणि प्रिया बेनीवाल यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मिलिंद आणि प्रिया एड शीरनच्या गाण्यावर नाचताना दिसत असून त्यांचा लूक खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. गायक गुरु रंधावाने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून मिलिंद आणि प्रियाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्याने “माझ्या भावाला आणि प्रियाला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला नेहमीच आशीर्वाद देवो” यासोबतच त्याने या साखरपुड्याच्या एक व्हिडिओ देखील शेअर केला असून, यामध्ये सर्व मित्र मिलिंद आणि प्रियासोबत डान्स करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच मिलिंद गाबाने एका मुलाखतीमध्ये त्याच्या लग्नाबद्दल खुलासा करत सांगितले होते की, त्याला नेहमीच भारतीय लग्न पाहिजे होते. तो म्हणाला की, “लग्न नेहमीच आयुष्यातील सर्वात मोठा भाग असतो. मी नेहमीच स्वप्न पाहिले की, माझे लग्न मोठे आणि भव्य व्हावे. ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली ते सर्वच या लग्नात मला पाहिजे होता.” मिलिंदला बिग बॉस ओटीटी शोमुळे तुफान लोकप्रियता मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा