Wednesday, July 3, 2024

अनेक वर्षांनी मिनी माथुरने केला इंडियन आयडल सोडण्यामागील खरा खुलासा म्हणाली, ‘रियॅलिटी नसते…’

मिनी माथूर हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ओळखीचे नाव. अनेक रियॅलिटी शोचे सूत्रसंचालन करून तिने तिची एक उत्तम सूत्रसंचालक अशी ओळख मिळवली. मिनीने तिच्या प्रतिभेच्या जोरावर इंडियन आयडलचे तब्बल ६ पर्व होस्ट केले. मिनी हा इंडियन आयडलचा चेहरा बनली होती. मात्र अचानक तिने हा शो सोडला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मिनी माथुरने इंडियन आयडल का सोडले याचा खुलासा तिने कधीच केला नाही. त्यामागचे कारण आजपर्यंत समोर आले नाही. पण तिने आता यामागचा खुलासा केला आहे.

नुकताच मिनी माथुरने इंडियन आयडल सोडण्याबद्दल काही कारणे सांगितली आहेत. ती म्हणाली की निर्मात्यांना कंस्ट्रैक्टिव मोमेंट्स पाहिजे होत्या. तशी ते मागणी देखील करू लागले होते. तिला हे अजिबातच रुचत नव्हते. मिनी म्हणाली, “मी शोमधील सर्वच स्पर्धकांशी जोडली गेलेली होती. मी त्यांना अनेकदा माझ्या घरी जेवायला देखील बोलवायची. ते देखील खूपच आनंदाने माझ्या घरी यायचे आम्ही तासंतास गप्पा मारायचो. मात्र जेव्हा मी हा शो सोडायचे ठरवले तेव्हा मला जाणवले होते की, आता या शोमध्ये काहीच सत्यता उरलेली नाही. मी सहा सिझन होस्ट केले. त्यानंतर सर्वांनी फक्त पैसा कमवण्यावर लक्ष केंद्रित केले होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mini Mathur (@minimathur)

मिनीने पुढे हे देखील सांगितले की, “शोमधील रियॅलिटी आता कंस्ट्रैक्टिव होणे हे गोष्ट मला अजिबातच आवडली नव्हती. शोचे निर्माते देखील माझ्याकडे आले आणि मला म्हणाले शोमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र येत आहे. त्यांचे काही मोमेंट करायचे. त्यावर मी म्हटले की, मोमेंट करायची असते की होत असते? या नंतर अशा अनेक गोष्टी मी केल्या. मात्र त्या सर्व एकसारख्या होत्या. अखेर मी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला.”

दरम्यान मिनीने टेलिव्हिजनवर अनेक शोचे सूत्रसंचालन केले आहे. मात्र तिला इंडियन आयडलसाठी खास ओळखले जाते. यासोबतच तिने झलक दिखला जा मध्ये स्पर्धक म्हणून देखील सहभाग घेतला होता. तिने बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक कबीर खान यांच्याशी लग्न केले असून, त्यांना दोन मुलं आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मिळाली गायक समर सिंगची ट्रांजिट रिमांड, होणार मोठा खुलासा?

हे देखील वाचा