बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती तिचे अनेक मजेशीर व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करून सगळ्यांचे मनोरंजन करत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती यूट्युबर कुशा कपिलासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कुशा एका रागवलेल्या आईच्या रुपात दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये ती आजच्या काळातील मुलांना विचारत आहे की, ते घरामध्ये आईला मदत का करत नाहीत ?? यामध्ये मीरा लहान मुलांच्या भूमिकेत आहे. कुशाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ती वेगळ्या पद्धतीने देताना दिसत आहे.
हा व्हिडिओ तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुशा मीराला विचारते की, बाळा तुला बाथरूममध्ये एवढा वेळ का लागतो. यावर मीरा तिला काहीही न बोलता फक्त तिच्या भुवया उंचवत प्रतिक्रिया देताना दिसते. यानंतर कुशा तिला परत विचारते की, बाळा तू आपल्या नातेवाईकांशी कधी फोनवर का बोलत नाही ? यावर मीरा तिचा चेहरा टोपीच्या मागे लपवताना दिसत आहे.
त्यांचा हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूपच आवडत आहे, व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमधून त्यांनी आज कालच्या तरुण मुला-मुलींचे मुड आणि त्यांचे वागणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.
मीरा नेहमी सोशल मीडियावर तिच्या कुटुंबासोबतचे तसेच तिचे आणि फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिचे हे फोटो तिच्या आणि शाहिद कपूरच्या चाहत्यांना खूप आवडत असतात. शाहिद आणि मीराने 2015 साली लग्न केली आहे. त्यानंतर 2016 साली त्यांना मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी मिशा असे ठेवले आहे. तसेच 2018 मध्ये त्यांना जैन नावाचा मुलगा झाला आहे. मीरा तिच्या कुटुंबासोबत खूप आनंदात आहे, ती कुटुंबासोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.