[rank_math_breadcrumb]

ज्याचं आयुष्य अंथरुणाशी जाेडलेलं हाेतं, ताे आज नाचताेय – कारण सनी देओल !

मनिंदरने सनी देओलचे डाॅयलाॅग्स लक्षात ठेवायला सुरूवात केली. त्यामुळे त्याच डाेकं तेज झालं. आठवणशक्ती वाढली आणि अभ्यासातही मदत हाेऊ लागली.

कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी निर्माते-दिग्दर्शकांशी जाेडण्यासाठी ‘अपना अड्डा’ नावाचं एक मंच आहे. जून महिन्यात याचा कार्यक्रम जपानमधल्या टाेकियाे शहरात झाला. या कार्यक्रमात एक असा कलाकारही सहभागी झाला, ज्यानी सनी देओलचे चित्रपट पाहून स्वतःचं आयुष्य बदलवलं आणि संघर्षाची लढाई जिंकली. जपानच्या टाेकियाे फिल्म सेंटर काॅलेज ऑफ आर्ट्समध्ये जून महिन्यात ‘अपना अड्डा’ कार्यक्रम झाला. या वेळी सगळा हॉल टाळ्यांनी दुमदुमून गेला, जेव्हा मनिंदर सिंग उप्पल नावाच्या एका दिव्यांग मुलाने सनी देओलच्या सिनेमांचे डायलॉग्स एकामागोमाग एक बोलायला सुरुवात केली.

मनिंदरचा जन्म वेळेआधी झाला होता, त्यामुळे तो आयुष्यभर अंथरुणावरच राहील, असं लोकांना वाटत होतं. पण त्याच्या जिद्दीने आणि सनी देओलच्या चित्रपटांनी त्याला खूप प्रेरणा दिली. आज तो बारावी पास झाला आहे आणि कंप्युटर ऑपरेटरचा कोर्सही करत आहे. मनिंदरसोबत त्याची आई गगनदीप उप्पलही कार्यक्रमात आल्या होत्या. त्या म्हणाल्या, “माझं बाळ वेळेआधी जन्मलं आणि हॉस्पिटलमध्ये नीट ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्याच्या उजव्या शरीराचा मेंदूसोबतचा ताल बिघडला. तेव्हा मनिंदर फक्त तीन वर्षांचा होता. त्याच्या वडिलांना नोकरीसाठी जपानला यावं लागलं, आणि आम्ही भारतातच होतो. एक दिवस मनिंदर अंथरुणावर पडून टीव्ही बघत होता, आणि त्याला सनी देओल दिसला.”

मनिंदरला सनी देओल इतका आवडला की, त्याने त्याचे चित्रपट बघायचा हट्ट करायला सुरुवात केली. गगनदीप सांगतात, “मनिंदरने सनी देओलचे डायलॉग्स पाठ करायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचं डोकं तेज झालं, लक्ष लागायला लागलं आणि अभ्यासातही फायदा झाला. सनीच्या अ‍ॅक्शन चित्रपटांची नक्कल करत करत त्याच्या शरीराची हालचाल सुधारू लागली. आम्हांला तर, हे सगळं चमत्कारच वाटलं. ज्या मुलाबद्दल लोक म्हणायचे की तो, आयुष्यभर अंथरुणावरच राहील, तो सनी देओलचे चित्रपटे बघून चालायला लागला, फिरायला लागला आणि नाचायलाही लागला.”

हे सगळं सांगताना मनिंदरच्या आईच्या डोळ्यांत पाणी येतं. त्या म्हणतात, “सनी देओलच्या चित्रपटांमुळेच आमच्या मुलाला नवं आयुष्य मिळालं. देवाच्या पाठोपाठ आम्ही सनी देओलचेही खूप आभार मानतो. आमची एकच इच्छा आहे, एक दिवस मनिंदरची सनी देओलशी भेट व्हावी.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

 सितारे जमीन पर’चा ओपनिंग वीकेंडला धमाका; तीन दिवसांत कमावले एवढे कोटी…