Saturday, June 29, 2024

‘कालीन भैय्या’च्या संस्कारी सूनबाईंनी हद्दच केली पार, फक्त ब्रालेटमधील फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

मागील काही वर्षांमध्ये सर्वाधिक प्रसिद्धी कोणत्या वेबसीरिजला मिळाली?, असा प्रश्न विचारल्यास कदाचित सर्वांचे उत्तर ‘मिर्झापूर’ हेच असेल. या वेबसीरिजच्या आगामी भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. या वेबसीरिजचे पहिले २ सिझनने प्रेक्षकांना खूपच आवडले. अशात प्रेक्षक या वेबसीरिजच्या तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असल्याचे दिसते. कारण, मागील काही दिवसांपूर्वी गुड्डू भैय्या म्हणजेच अभिनेता अली फजल याने ‘मिर्झापूर ३’मधील आपला लूक शेअर केला होता. त्यानंतर चाहत्यांची उत्सुकता गगनाला भिडली आहे. अशात ‘मिर्झापूर ३’मध्ये मुन्ना भैय्याची पत्नी आणि कालीन भैय्याची सून ‘माधुरी यादव’ हिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.

‘मिर्झापूर ३’ (Mirzapur 3) वेबसीरिजमध्ये माधुरी यादव (Madhuri Yadav) हे पात्र अभिनेत्री ईशा तलवार (Isha Talwar) हिने साकारले आहे. ईशा ही खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि हॉट आहे. तिच्या नुकत्याच व्हायरल होत असलेल्या फोटोंनी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

ईशाने आपल्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये सगळ्याच मर्यादांना छेद दिला आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोटो शेअर केला आहे. हा फोटो खूपच बोल्ड आहे. या फोटोत ईशाने फ्लोरल प्रिंट असणारी ब्रालेट परिधान करून पोझ दिली आहे. यासोबतच तिने ब्राच्या वर त्याच रंगाचा क्रॉप श्रग परिधान केला आहे. तिचे ओले केस तिला आणखीच हॉट बनवत आहेत. या फोटोवरून समजते की, ईशाने समुद्रातून बाहेर येताच हा फोटो घेतला आहे. या फोटोला सोशल मीडियावर जोरदार पसंती मिळत आहे. दुसरीकडे नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे.

एका युजरने कमेंट करत लिहिले की, “माधुरी भाभी झिंदाबाद.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “संतूर साबणाने अंघोळ करून आलीये का? खूपच भारी दिसत आहेस.” या बोल्ड बिकिनी ड्रेसमध्ये ईशा तिचा फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत १ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या लवस्टोरीचा वरुण धवन झाला लवगुरू, व्हिडिओ होतोय व्हायरल

ऋचा चड्ढा ‘सेक्सिझम’ मानते अतिशय सामान्य वागणूक, म्हणाली ‘बदलाबरोबर नवीन सुरुवात होईल’

काय सांगता! सलमान खानच्या ‘या’ चित्रपटात एक, दोन नाही, तर असणार दहा नायिका

हे देखील वाचा