आजकाल ott प्लॅटफॉर्म वरती अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध आहेत. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून अनेक प्रेक्षक हे घरबसल्या जे पाहिजे ते पाहू शकत आहेत. त्यामुळे ott कंटेंटचा क्रेझ वाढत आहे. तसेच बॉलिवूड चित्रपट सोबतच वेबसिरीजनी सुद्धा आपले स्थान निर्माण केले आहे. अशीच एक सिरीज म्हणजे मिर्जापुर, ही सिरीज इतकी गाजली की आता याचा चित्रपट ही येत आहे. आणि हा मिर्जापुर चित्रपट आता 4 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
मिर्जापुर चित्रपटचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले आहे. मिर्झापूरमधील परिचित अराजकता एका रखरखीत वाळवंटी प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा साकारली गेली आहे. सर्वात धक्कादायक दृश्यांपैकी एक म्हणजे एका मृतदेहाला गाडीच्या मागे फरफटत नेले जात असल्याचे दाखवले आहे, ज्यामुळे वाळूवर रक्ताचा ठसा उमटत आहे. हे दृश्य, या फ्रँचायझीचे वैशिष्ट्य बनलेल्या क्रूरतेला अधोरेखित करते.
मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये मुन्ना भैय्या हे पात्र मरण पावल्यानंतर, दिव्येंदूचे या भूमिकेत पुनरागमन ही या चित्रपटाची सर्वात जास्त चर्चेत असलेली बाब आहे. या चित्रपटात पंकज (pankaj)त्रिपाठी अखंडानंद “कालीन” त्रिपाठी, अली फजल गुड्डू पंडित, श्वेता त्रिपाठी गोलू गुप्ता आणि अभिषेक बॅनर्जी सुबोध यांच्या भूमिकेत परतले आहेत. या चित्रपटाद्वारे जितेंद्र कुमार आणि सोनल चौहान हे मिर्झापूरच्या दुनियेत पदार्पण करणार आहेत. या प्रोजेक्टचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
पहिल्याच दिवशी 150 कोटीचा टप्पा पार, धुरंधर 2’च्या कमाईने बॉक्स ऑफिस हादरलं









