Wednesday, July 3, 2024

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगबाबत धक्कादायक ब्रेकिंग! लाईव्ह कॉन्सर्टमध्येच घडला प्रकार, लगेच वाचा

आपल्या आवाजाने जगाला वेड लावणारा प्लेबॅक सिंगर अरिजित सिंग सध्या चांगलाच चर्चेत आहे. खरे तर, सिंगरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात अलीकडेच तो महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करत होता. दरम्यान, एका व्यक्तीने अरिजितचा हात वेगाने ओढला आणि गायकाला दुखापत झाली.

या व्हिडीओमध्ये अरिजित म्हणताेय की, “तू मला खेचण्याचा प्रयत्न करत होतास कृपया मंचावर या. ऐका, माझा हात दुखत आहेत, ठीक आहे? हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. माझे ऐका, विनाकारण एखाद्याला दोष देण्याचा प्रकार मी करत नाही, बरं का? माझा हात खरच दुखत आहे. तुम्ही इथे मजा करायला आला आहात, काही हरकत नाही. पण, जर मी परफॉर्म करूच शकलाे नाही, तर तुम्ही आनंद कसा घेणार. ही अतिशय साधी बाब आहे. तू मला असे खेचत आहेस… आता माझे हात थरथरत आहेत. मी सोडू का?” यानंतर अरिजित सिंह म्हणाला, “मला असे का ओढले? माझे हात थरथरत आहेत. मी माझा हात हलवू शकत नाही आहे.”

माध्यमातील वृत्तानुसार, जेव्हा सिंगर परफॉर्मन्स दरम्यान चाहत्यांशी बोलत होता. त्यानंतर एका व्यक्तीने त्याच्याशी हॅंडशेक करण्याचा प्रयत्न केला आणि गायकाचा उजवा हात वेगाने ओढला. त्यामुळे सिंगरचा तोल बिघडला आणि त्याच्या हाताला दुखापत झाली.

या व्हिडिओ कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘त्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले पाहिजे, त्याची हिंमत कशी झाली अश्याप्रकारे गैरवर्तन करण्याची?’ तर दुसऱ्याने लिहिले,’ तु लवकर बरे व्हावा आणि चांगलं आरोग्य मिळावे अशी माझी इच्छा आहे.’.(misbehavior during live concert with singer arijit singh injured his hand )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकेकाळी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या अक्षय अन् रवीनाचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

सरी या मराठी चित्रपटात वाजतंय ब्लॉकबस्टर ‘कांतरा’च्या संगीतकाराचे संगीत

हे देखील वाचा