संगीतविश्वातील कलाकारांनी त्यांच्या आवाजाच्या जोरावर खूप मोठा पल्ला गाठला आहे. त्यांचे चाहते त्यांचा आवाज ऐकण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी खूपच उत्सुक असतात. मात्र, जेव्हा हेच गायक, संगीतकार चुकीचे पाऊल उचलतात, तेव्हा तेच चाहते त्यांच्यावर आगपाखडही करू लागतात. कदाचित चाहते गायक राहुल जैन यावरही असाच संताप व्यक्त करत असतील. कारण, राहुल याच्याविरुद्ध लैंगिक अत्या’चाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. १५ ऑगस्ट) मुंबई पोलिसांनी राहुलविरुद्ध एफआयआर दाखल केली.
गायक राहुल जैन (Rahul Jain) याच्यावर ३० वर्षीय कॉस्च्युम स्टायलिस्ट महिलेने लैंगिक अत्या’चार केल्याचा आरोप लावला आहे. महिलेचा असा आरोप आहे की, राहुलने तिला त्याच्या मुंबईतील फ्लॅटवर बोलवून तिच्यावर लैंगिक अत्या’चार केले.
View this post on Instagram
सोशल मीडियावर साधलेला संपर्क
महिलेने ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत जबाब नोंदवताना म्हटले की, ‘राहुलने तिच्याशी सोशल मीडियावरून संपर्क साधला होता. तसेच, तिच्या कामाची प्रशंसाही केली होती. यानंतर राहुलने महिलेला त्याच्या फ्लॅटवर बोलावले, जिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्या’चार केले.’
गायकाला करायचे होते पुरावे नष्ट
महिलेने पुढे सांगितले की, ‘जेव्हा तिने गायकाला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राहुलने तिला मारहाण केली आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला.’
माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, पोलिसांनी अधिकाऱ्याने सांगितले की, महिला ११ ऑगस्ट रोजी राहुल जैनच्या फ्लॅटवर गेली होती. तिथे त्याने तिला त्याचे सामान दाखवण्याच्या बहाण्याने त्याच्यासोबत बेडरूममध्ये येण्यास सांगितले. तसेच, त्याने तिच्यावर अत्या’चार केला. खरं तर, पीडित महिला ही फ्रीलान्स कॉस्च्युम स्टायलिस्ट म्हणून काम करते.
या कलमांतर्गत गुन्हा दाखल
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गायक राहुल जैनविरुद्ध भारतीय दंडविधान संहितेच्या ३७६, ३२३ आणि ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अद्याप राहुल जैनला अटक करण्यात आली नाहीये.
गायकाने फेटाळले केले आरोप
गायक राहुल जैन याने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याने म्हटले आहे की, “मी या महिलेला ओळखतही नाही. माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत.” तो पुढे म्हणाला की, “आधीही एका महिलेने माझ्याविरुद्ध असे आरोप लावले होते. मात्र, न्यायालयातून मला न्याय मिळाला होता. ही महिलाही त्या महिलेची सहकारी असू शकते.”
विशेष म्हणजे, बॉलीवूडमधील एक गीतकार आणि लेखिकेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राहुल जैनविरुद्ध लैंगिक अत्या’त्कार, जबरदस्ती गर्भपात आणि फसवणूक यासह विविध आरोप लावत एफआयआर दाखल केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर अडचणीत आला आमिर खान, वितरकांना द्यावी लागणार ‘इतकी’ भरपाई
अभिनेता आविष्कार दार्वेकरचे दुसरे नव्हेतर तिसरे लग्न, दुसऱ्या पत्नीने केले धक्कादायक आरोप
‘या’ एका कारणासाठी अभिनेते धर्मेंद्र चुकवायचे सीन, शोले चित्रपटातला रंजक किस्सा ऐकून व्हाल थक्क