Friday, July 5, 2024

अभिनंदन! ३१ सौंदर्यवतींना मागे सारत कर्नाटकाच्या सिनी शेट्टीने जिंकला मिस इंडियाचा ताज

एका स्पर्धेनंतर भारताला मिस इंडिया २०२२ मिळाली आहे. ३ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस इंडिया २०२२ चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये नेत्रदीपक प्रक्रियेनंतर सिनी शेट्टीला (sini shetty) मिस इंडियाचा मुकुट देण्यात आला. कर्नाटकच्या सिनी शेट्टीला मिस इंडिया २०२२ ची विजेती घोषित करण्यात आली आहे. त्याचवेळी, राजस्थानच्या रुबल शेखावतला मिस इंडिया २०२२ मध्ये फर्स्ट रनर अप घोषित करण्यात आले, तर उत्तर प्रदेशच्या शिनाता चौहान हिला सेकंड रनर अपचा मुकुट देण्यात आला.

दरवेळेप्रमाणेच यावेळीही मिस इंडिया स्पर्धा खास होती. यावेळी या स्पर्धेत सौंदर्याच्या ३१ सौंदर्यवतींमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. विविध राज्यातील विजेत्या मॉडेल्सनी मैदानात उतरून रॅम्पवर दणदणाट केला. या संपूर्ण स्पर्धेत झारखंडच्या रिया तिर्कीसह काही मॉडेल्सची नावं खूप चर्चेत होती. पण अखेरीस सिनी शेट्टीने मिस इंडिया २०२२ चा ताज आपल्या डोक्यावर घेतला.

मिस इंडिया २०२२ च्या ग्रँड फिनालेच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड स्टार्स दिसले. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर चित्रपटातील कलाकार अवतरताच सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. बॉलीवूडच्या सर्व अभिनेत्रींनी कहर केला होता. या इव्हेंटमध्ये मलायका गोल्डन कलरच्या डीप नेक ट्रान्स पॅरेंट गाऊनमध्ये अप्रतिम दिसत होती. त्याचवेळी अभिनेत्री नेहा धुपियाही सिल्व्हर कलरच्या सिल्व्हर गाऊनमध्ये दिसली. ब्लॅक अँड व्हाईट कलर वेल बॉटम स्टाईल आउटफिटमधला क्रिती सॅननचा लूकही खूपच सुंदर दिसत होता.

२०२२ ची मिस इंडिया निवडण्याची जबाबदारी एका लांब पॅनेलची होती. ग्रँड फिनालेमधील न्यायाधीशांच्या पॅनेलमध्ये एक नव्हे तर सहा सेलिब्रिटींचा समावेश होता, ज्यामध्ये मलायका अरोरा, नेहा धुपिया, दिनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि शम्मक दावर न्यायाधीश म्हणून सामील झाले होते. इतकेच नाही तर भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज देखील या पॅनेलमध्ये होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘सुपर मॉडेल’ मिलिंद सोमण यांचे पत्नीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तुम्हीही पाहा

अजय देवगणची लेक श्रीदेवीच्या पोरीवर भारी; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा’

करीनाला किस करत होता सैफ, तेवढ्यात अभिनेत्रीने खेळला मोठा डाव, एकदा पाहाच

 

हे देखील वाचा