‘मिस युनिव्हर्स २०२०’ चे विजेतेपद भारताला मिळू शकले नाही, परंतु ६९ व्या मिस युनिव्हर्स भारतानेही आपला डंका वाजवलाय. पहिल्या ५ मध्ये भारताने स्थान मिळवले आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या एडलिन कॅस्टेलिनोने मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिसरी रनरअप ठरली आहे, तर अव्वल क्रमांक मेक्सिकोच्या अँड्रिया मेझाने पटकावला.
स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आता, एडलिन कॅस्टेलिनो फ्लोरिडाहून भारतात परतली आहे. विमानतळाच्या बाहेर ती हातात तिरंगा घेताना दिसली.
यावेळी, एडलिन खूप आनंदी आणि आत्मविश्वासू मुलगी दिसत होती. ती शायनी ब्लेझरमध्ये कमालीची दिसत होती.
तिचे बरेच फोटो समोर येत आहेत, एका फोटोत तिने मास्क घातला आहे. त्यावर लिहिले होते, ‘मिस युनिव्हर्स इंडिया.’
एडलिनबद्दल बोलायचे झाले तर, ती मूळची कुवेतची आहे. तिचे पालक कर्नाटकचे आहेत. मिस युनिव्हर्स २०२१ मध्ये जाण्यापूर्वी एडलिनने ‘मिस दिवा युनिव्हर्स २०२०’ चे विजेतेपद जिंकले आहे.
एडलिन हे विजेतेपद जिंकू शकली नाही, परंतु स्पर्धेत विचारल्या गेलेल्या प्रश्नावर तिने छान उत्तर दिले आहे, यामुळे तिने सर्वांचे मन जिंकले आहे. लॉकडाऊन या विषयावर एडलिनला प्रश्न विचारला गेला होता. सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होत आहे.
एडलिनला विचारले गेले, की देशांनी कोरोनमुळे लॉकडाऊन लावावे की, ज्याचा अर्थव्यवस्थेला गंभीर परिणाम होईल किंवा त्यांनी आपली सीमा उघडून संसर्गाचे प्रमाण वाढू द्यायला पाहिजे? यावर एडलिनने उत्तर दिले, “मी भारतातून आले आहे, आणि याक्षणी भारत ज्या गोष्टींचा सामना करत आहे, मला एक महत्वाची बाब समजली. तुमच्या प्रियजनांच्या आरोग्याखेरीज काहीही महत्वाचे नाही. आपण अर्थव्यवस्था आणि आरोग्य यांच्यात समन्वय साधला पाहिजे. हे तेव्हाच होऊ शकते, जेव्हा सरकार लोकांच्या खांद्याला खांदा लावून असे काहीतरी करेल जे अर्थव्यवस्थेलाही मदत करेल.
एडलिन वयाच्या १५ व्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईत आली होती. तसेच ती शेतकर्यांशी संबंधित सामाजिक काम करते. एडलिनएडलिन ला ‘फेमिना’ मॅगेझिनच्या मुख्यपृष्ठावर स्थान मिळाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘वडिलांनाच मानले होते बॉयफ्रेंड’, नीना गुप्ता यांनी केला वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा
-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ