माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत असून, मानुषीचा एक व्हिडिओ खूप वायरल होत आहे. नुकतेच मानुषीला मुंबई एयरपोर्टवर पाहण्यात आले. तेव्हा मानुषीने ब्लू जीन्स आणि ब्लॅक टॉप आणि व्हाईट मास्क घातला होता मात्र यावेळी ती तिच्या ब्लॅक टॉपचे प्राईज टॅग काढायला विसरली. मानुषीने टॅगसह तो टॉप घातल्याने ती ट्रोल होत आहे.
मानुषी मुंबई एयरपोर्टवर आली असताना तिने घातलेल्या टॉपचे प्राईज टॅग काढायला ती विसरली. तिथे असलेल्या काही लोकांनी ते पाहून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकाऱ्यानी अनेक कंमेंट करत तिला ट्रोल केले. यापूर्वी देखील अनेक अभिनेत्री प्राईज टॅग न काढता सार्वजनिक ठिकाणी फिरताना पहिल्या गेल्या आहेत. मानुषीला २०१७ साली जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून घोषित करण्यात आले होते. मानुषीला मिस वर्ल्ड जिकंण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
लवकरच मानुषी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ या सिनेमातून मानुषी सिनेसृष्टीत पाऊल टाकणार आहे. हा चित्रपट महाराज पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारित असून मानुषी या सिनेमात संयोगिताची भूमिका साकारणार आहे. अक्षय, मानुषी सोबत संजय दत्त देखील या चित्रपटात दिसणार आहे. सूत्रांनुसार मानुषी विकी कौशल सोबत एका कॉमेडी सिनेमातही दिसणार आहे.